Headlines

गुणवत्ता व परिश्रमावर विश्वास ठेवत ध्येयाकडे वाटचाल करा:विचारवंत विजय कुवळेकर यांचे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन




कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या क्षमतांचा विकास करून त्यांना सर्वगुणसंपन्न बनविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखण्यासाठी शिक्षकांकडे निकोप, सकारात्मक आणि स्वागतशील दृष्टी असली पाहिजे. शिल्पकाराप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवावे. ज्याचे शिकणे थांबते, त्याचे शिकवणेही थांबते. त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनीही सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विचारवंत विजय कुवळेकर यांनी केले. जीवनात उच्चपदावर पोहोचण्यासाठी परिश्रम, बुद्धिमत्ता, निष्ठा, जिद्द आणि चिकाटी या गुणांची आवश्यकता असते. परिस्थितीपेक्षा स्वतःमधील गुणवत्ता आणि मेहनतीवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. ज्ञानसंपदा शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कुवळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे समुपदेशक डॉ. सागर देशपांडे व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. जयंत कुलकर्णी उपस्थित होते. या समारंभात शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे व चित्रफितीचे अनावरण झाले. यावेळी संपदा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण बजाज, उपाध्यक्ष मिलिंद गंधे, सचिव अरुण कुलकर्णी, खजिनदार अविनाश बोपर्डीकर, कारभारी भिंगारे, श्रीहरी टिपूगडे, प्राचार्य शिवांजली अकोलकर व उपप्राचार्य प्रसाद बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सचिव अरुण कुलकर्णी यांनी २५ वर्षांचा आढावा घेत विद्यार्थी कल्याणासाठी भविष्यातील ध्येय धोरणांची माहिती दिली. मुक्ता दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश बोपर्डीकर यांनी आभार मानले. कैलास जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. शिक्षिका श्रद्धा उगले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला तसेच उपप्राचार्य प्रसाद बर्वे यांना सीड्स ऑफ चेंज इनोव्हेटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास विनोद बजाज, दिनेश अग्रवाल, राजेंद्र भगत, शरद कुलकर्णी, विजय कुलकर्णी, मुकुंद बिलोलीकर, सुमित सोनवणे, वरुण भगत, अक्षय वाघमोडे, सुहास मुळे, डॉ.सुनीता भागवत आदी उपस्थित होते. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी नियोजन जयंत कुलकर्णी म्हणाले, पुढील काळात शैक्षणिक क्षेत्रात फार मोठ्या उलथापालथी होणार आहे. त्यामुळे त्याला तोंड देण्यासाठी आत्तापासूनच नियोजन केले पाहिजे. शिक्षक प्रशिक्षण केंद्रातून निर्माण होणारे काम दिशादर्शक असेल, असे सांगून भविष्यातील शिक्षण पद्धती व नियोजन यांचे विश्लेषण त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *