Headlines

बीडला पाण्यात गुंगीचे औषध देऊन वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार:अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल




वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या (बीएचएमएस) विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करत तिचे व्हिडिओ काढल्याची घटना बीडमध्ये घडली. या व्हिडिओंद्वारे ब्लॅकमेल करत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख मुस्सवीर शेख वसीमवर गुन्हा दाखल केला. तरुणी २०१८-१९ मध्ये नीटच्या क्लासला असताना आरोपी तिच्या संपर्कात आला. बीएचएमएसला प्रवेश घेतल्यानंतरही तो पाठलाग करून शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत होता. तिने नकार दिल्याने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी आई-वडील घरी नसताना त्याने घरात घुसून तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध अवस्थेत अत्याचार करून व्हिडिओ काढले. याच व्हिडिओंची धमकी देत ८ डिसेंबर २०२४ रोजी एका हॉटेलमध्ये नेऊन त्याने पुन्हा अत्याचार केले. अखेर तक्रार दाखल ४ सप्टेंबर रोजी रात्री शेख मुस्सवीरने फोन केला. ५ सप्टेंबर रोजी, चित्रपट पाहण्यासाठी चल, नाहीतर व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून नातेवाइकांना पाठवेन, अशी धमकी त्याने दिली. या त्रासाला कंटाळून तरुणीने आई-वडिलांना आपबीती सांगितली. कुटुंबीयांनी धीर दिल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *