![]()
गोपाळपूर येथील ऐतिहासिक श्री गोपाळकृष्ण मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. जन्माष्टमीच्या औचित्याने मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी आणि पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी भल्या पहाटे ६ वाजल्यापासून मंदिरात श्री गोपाळकृष्णाच्या मूर्तीवर महाअभिषेक सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी प्रसिद्ध देहूकर महाराजांचे जन्माचे कीर्तन रंगणार आहे. दिवसभरात भाविकांना श्रींच्या मूर्तीवर अभिषेक घालण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे पारंपरिक नित्योपचार पार पडणार आहेत. तसेच ग्रामस्थांच्या वतीने दुपारी गोपाळपूरची परंपरा असलेला पारंपरिक ‘म्हशी पळवण्याचा’ वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी मंदिराचे पुजारी दिलीप गुरव, दत्तात्रय गुरव, उद्धव गुरव, दादासाहेब गुरव, श्रीधर गुरव, सतीश गुरव, राजेंद्र गुरव, बालाजी गुरव, शरद गुरव यांच्यासह समस्त गुरव परिवार व नागरिक परिश्रम घेत आहेत. जन्माष्टमीनिमित्त मंदिरावर रोषणाई करण्यात आली असून सर्व भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Source link