Headlines

उभी पिके करपू लागली; शेतकऱ्यांच्या चांगल्या पिकाच्या आशेवर फिरले पाणी:जमिनीला भेगा, कपाशी-सोयाबीनची वाढ खुंटली‎



पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊनही गेल्या ३२ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्य

.

पेरणी झाली; मात्र पावसाने साथ सोडली : यंदा हंगामाच्या सुरुवातीला कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. जमिनीत पुरेसा ओलावा असल्याने उगवणही चांगली झाली. मात्र, गेल्या ३२ दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतातील काळ्या जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. वरच्या थरातील ओलावा पूर्णपणे संपल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. विशेषतः कपाशीची झाडे निस्तेज होऊन काही ठिकाणी कोमेजू लागली आहेत. सोयाबीन पिकासाठी फुलोरा व वाढीचा हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतानाच पाऊस गायब झाल्याने शेंगा भरण्यावर व उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

महागडी बियाणे, खतांचा खर्च; डोळे आभाळाकडे:

शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, शेत-मशागत व मजुरीवर हजारो रुपये खर्च केले आहेत. अनेकांनी यासाठी बँकांचे कर्ज वा खासगी सावकारांकडून उधारी घेतली आहे.

पाऊस आला म्हणून पेरणी केली खरी; मात्र आता जर पीकच जळून गेले तर झालेला खर्च कसा भरून काढायचा आणि कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

सर्व पिकांची अवस्था बिकट ^ पावसाअभावी पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सोयाबीनची वाढ पूर्णपणे खुंटली असून पिके मोठ्या प्रमाणात सुकू लागली आहेत. कपाशीचे पीकही धोक्यात आले आहे. वेळेत पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाईल. – नितीन अवघाते, शेतकरी, दुर्गवाडा.

तूर, कपाशीवरही संकट ^पिके कशीतरी तग धरून उभी आहेत. पावसाचा खंड पडल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली असून आमच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. संपूर्ण वर्षाचे अर्थकारण सोयाबीन पिकावर अवलंबून असते, तेच पीक संकटात सापडले असून तूर आणि कपाशीची अवस्थाही नाजूक झाली आहे. – शैलेश पाचडे, शेतकरी, लंघापूर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *