Headlines

अकोटमध्ये नशामुक्त कावड उत्सवाचा संकल्प; 27 मंडळ नोंदवणार सहभाग:डीजेवर अश्लील गाणी, धार्मिक तेढ, इतर संवाद टाळण्याच्या सूचना



भक्तीच्या उत्सवाला व्यसनमुक्तीच्या सामाजिक संदेशाची जोड देत यंदा अकोट शहरात ‘नशापानमुक्त कावड उत्सव’ साजरा करण्याचा संकल्प श्रावण मास कावड उत्सव समितीने केला आहे. श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शहरात भव्य कावड शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात तब

.

श्रावण मास कावड उत्सव समितीच्या वतीने मागील २२ वर्षांपासून अकोटमध्ये ही परंपरा अविरत सुरू आहे. यंदा या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची नवी दिशा देत ‘नशापानमुक्त कावड उत्सव’ साजरा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अनंता मिसाळ यांनी दिली. यासाठी भुलजा-भुलाई मंदिर (भवानीपुरा) येथे समितीची आढावा बैठक झाली. त्यात २७ मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते. गतवर्षी महिला डीजे ऑपरेटर आणण्याचा प्रकार समितीने हाणून पाडला होता. या धार्मिक सोहळ्याला नशेचे गालबोट लागू नये. यासाठी समितीने यंदा संकल्प केला आहे. भाविकांनी नशेपासून दूर राहावे. पावित्र्य जपावे. असे आवाहन समितीने केले आहे. भाविकांसाठी फराळ, रुग्णसेवक संजय शेळके यांची रुग्णवाहिका, चोहोट्टा बाजार व देवरी फाटा येथे उपलब्ध आहे.

यात्रा आदर्श निर्माण करेल ^कावड उत्सवातून शिस्त, सामाजिक एकोपा व व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नशामुक्त वातावरणात भक्तीचा आनंद घ्यावा. नशेला दूर ठेवूया’ या भावनेतून ही यात्रा नवा आदर्श निर्माण करेल. – अनंता मिसाळ, अध्यक्ष, श्रावण मास कावड उत्सव समिती.

यंदाच्या कावड यात्रेत अकोटमधील २७ कावड मंडळे सहभागी होणार आहेत. यात जय भवानी क्रीडा प्रसारक मंडळ, रामटेकपुरा यांची २५१ भरण्याची कावड विशेष आकर्षण ठरणार आहे. त्यानंतर श्रीराम व्यायाम मंडळ, मोठे बारगण, जय गजानन कावड मंडळ, गजानन नगर यांच्या १५१ भरण्यांच्या कावडी सहभागी होतील. ७ सप्टेंबरला पहाटे ७ वाजता शहराच्या वेशीवरून कावड पालख्या सजवून मंडळे मार्गस्थ होतील. गणपती मंदिराची पालखी अग्रस्थानी असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *