Headlines

दिव्य मराठी ग्राऊंंड रिपोर्ट‎:मनपा शाळांमध्ये शुद्ध पाण्याची वानवा




शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत हक्क आहे. मात्र, शहरातील मनपा शाळांमध्ये याच सुविधेची कमतरता असल्याचे चित्र आहे. मनपाच्या ३१ शाळांपैकी तब्बल २६ शाळांमध्ये ‘आरओ’ची सुविधा नाही. पाणी उपलब्ध असले तरी ते शुद्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, ‘आरओ’साठी २०२४ मध्ये ‘डीपीडीसी’कडे प्रस्ताव पाठवूनही त्यावर कोणताच निर्णय झाला नव्हता. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार १४९ इतकी आहे. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १२ तर हिंदी माध्यमाच्या ५ व उर्दू माध्यमाच्या १३ शाळा आहेत. गुजराती माध्यमाची १ शाळा आहे. २ हजार ९६० मुले व ३ हजार १८९ मुलींची संख्या आहे. बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबांतील आहेत. शाळेत दिवसभर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तहान भागवण्यासाठी पाणी आवश्यक असते. मात्र, उपलब्ध पाणी शुद्ध आहे की नाहीॽ, याची कुठलीच हमी नाही. मनपाच्या ३१ शाळांपैकी केवळ पाच शाळांमध्ये ‘आरओ’ची सुविधा असल्याने उर्वरित २६ शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. प्रशासनाकडून पाण्याची व्यवस्था सर्वच शाळांत असल्याचे सांगितले जात असले तरी, शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. थेट टाकीतील पाणी : विद्यार्थी शाळांच्या परिसरातील पाण्याच्या टाकीतील पाणी थेट पिण्यासाठी वापरत असल्याचे पाहणीत दिसून आले. ग्लास उपलब्ध नाहीत : बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी ग्लास उपलब्ध नसल्याचे या पाहणीत आढळून आले. टाकी परिसरात अस्वच्छता : पाण्याची टाकी असलेल्या परिसरातही अस्वच्छता आढळून आली. टाकीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा दिसून आला. तसेच भोवती पाणी फेकले जात असल्याचे चिखलाचे साम्राज्य दिसून आले. ‘पीएमश्री’ शाळेतही ‘आरओ’ नाही : मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक ७ ही ‘पीएमश्री’ शाळा म्हणून निवडली आहे. या शाळेत ‘आरओ’ची मूलभूत सुविधा नाही. यावरुन दुसऱ्या शाळांची स्थिती कळते. २६ शाळांमध्ये ‘आरओ’ची सुविधा उपलब्ध नाही मनपाच्या २६ शाळांमध्ये आरओ यंत्रणा नसणे ही गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध असले तरी त्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याची प्रभावी यंत्रणा नाही. या सुविधेसाठी २०२४ मध्ये जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीडीसी) प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. २०२४ मध्ये प्रस्ताव पाठवला होता ^शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आरओ उभारण्यासाठी २०२४ मध्ये ‘डीपीडीसी’कडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, त्याबाबत पुढील कार्यवाही झाली नाही. निधी उपलब्ध न झाल्याने आरओ सुविधा बसविण्यात आली नाही. – हरिश्चंद्र इटकर, शिक्षणाधिकारी, मनपा महापालिकेच्या शाळांकडे दुर्लक्ष; सुविधाही नाहीत महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधांइतक्याच मूलभूत आरोग्य सुविधाही महत्त्वाच्या मानल्या जातात. शाळेतील व र्गखोल्या, शिक्षक, शैक्षणिक साहित्य यांसोबत शुद्ध पिण्याचे पाणी ही प्राथमिक गरज आहे. मात्र, ३१ पैकी २६ शाळांमध्ये आरओची व्यवस्था नसल्याने या सुविधेकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे सांगते. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून या मुलभूत सुविधेकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. “दिव्य मराठी’च्या पाहणीदरम्यान काय आढळले?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *