Headlines

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 8 वा दिवस:वैद्यकीय उपचार त्यागल्याने मराठा आंदोलकांची चिंता वाढली




मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक उपोषणस्थळी दाखल झाले असून आंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी काल रात्रीपासून वैद्यकीय उपचार, सलाईन आणि पाणी घेण्यास पुन्हा नकार दिल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांची चिंता अधिक वाढली आहे. 58 लाख कुणबी-मराठा नोंदीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला त्यांचे 11 वे उपोषण सुरू केले. त्यावर सातव्या दिवशी ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली. जरांगे आणि मंत्र्यांच्या भेटीगाठीवर तीव्र आक्षेप घेत ओबीसींच्या घटनादत्त हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला. त्याला जरांगेंनीही प्रत्युत्तर दिले. ..तर मी रस्त्यावर उभा राहील छगन भुजबळ म्हणाले की, आमचे हे मंत्री सतत जाऊन ज्या पद्धतीने पाय धरतायत, लाड पुरवतायत ही काय पद्धत आहे? उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी 10 तारखेपर्यंत जीआर काढण्याचे आश्वासन दिले आहे. पण जर ओबीसींच्या मुळावर येत असेल तर हा छगन भुजबळसुद्धा लढायला रस्त्यावर उभा राहील. भुजबळांनी ओबीसींचे सगळे खाल्ले- जरांगे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळांनी ओबीसींचे सगळे खाल्ले. ओबीसी समाज आता हुशार झाला आहे. जात पडताळणी समितीने गोरगरिबांवर अन्याय करू नये. मराठा समाजही महायुतीपासून दूर जाऊ शकतो, असे प्रत्युत्तर दिले. महायुतीमागे मराठ्यांचे मतदान नाही का, असा सवालही त्यांनी केला. दोन दिवसांत सरकारचे निर्णय जरांगेंना पाठवणा- लाड भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले की, सरकारने घेतलेले निर्णय कागदावर पाठवा, असे जरांगे यांनी सांगितले आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसांत ते निर्णय आम्ही त्यांना पाठवू. त्यानंतर जरांगे अभ्यासकांशी चर्चा करून निर्णय घेतील. हे ही वृत्त वाचा राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष:लाखो रुपयांची बक्षिसे अन् सेलिब्रिटींची उपस्थिती ठरणार मुख्य आकर्षण
राज्यभरात आज दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी आयोजक आणि मंडळांकडून निष्णात गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय, अनेक नामांकित हंड्यांच्या ठिकाणी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांची खास उपस्थिती हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *