![]()
विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विद्यापीठातील प्राधिकरणांच्या निवडणुका, विद्यार्थी हिताचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा, अशी मागणी अ. भा. विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच अमरावतीच्या माध्यमातून कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्याकडे गुरुवारी लेख
.
या कायद्यानुसार विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पूर्ण करून प्राधिकरणाचे गठन करा, विद्यार्थी परिषद निवडणूक सुरू करा, अभ्यास मंडळात शेवटच्या वर्षातील विद्यापीठ स्तरावरील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी हा निमंत्रित सदस्य असतो, त्याची अंमलबजावणी करा. विद्यापीठ परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक व गतिमान होण्यासाठी सर्व विषयांचे निकाल ४५ दिवसात लावणे बंधनकारक करा, विद्यापीठ क्षेत्रातप्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठ उपकेंद्र कार्यान्वित करा, महाविद्यालय व वर्गातील विद्यार्थी अनुपस्थिती बाबत घटकांशी चर्चा करून उपाय योजना करा, विद्यापीठातील प्रभारी संवैधानिक अधिकारी व प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरा. ‘वंदे मातरम-१५०’, ‘संत शिरोमणी रविदास ६५० जयंती उत्सव’, ‘श्री गुरु तेगबहादूर बलिदान -३५० वर्षे’, ‘भगवान बिरसा मुंडा जयंती १५० वर्ष’, याला अनुसरुन विद्यापीठ व जिल्हास्तरावरील युवक महोत्सव, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात उपक्रमांची अंमलबजावणी करा आदीचाही निवेदनात उल्लेख आहे.निवेदन देतेवेळी विद्यापीठ विकास मंच निमंत्रक व अधिसभा सदस्य राजेंद्रप्रसाद पांडे, ॲड. अमोल ठाकरे, प्रा. डॉ. श्याम मुंजे, सुनील तीप्पट, गिरीश शेरेकर, आशिष सावजी, अमित देशमुख, उज्वल बजाज आदी उपस्थित होते.
‘त्या’ महाविद्यालयांना कठोर बंधने घाला युवक महोत्सव, क्रीडा महोत्सव, आविष्कार, वार्षिक अंक, एनएसएस शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतले जाते. परंतु प्रत्यक्षात ७० टक्के महाविद्यालये यात सहभागीच होत नाहीत. अशा महाविद्यालयांवर कारवाई करून हे शुल्क विद्यार्थ्यांना परत करावेत आणि संबंधित महाविद्यालयांना सहभागी होणे बंधनकारक करावे, अशी मागणीही या वेळी केली.