![]()
पाऊसमान अत्यंत कमी असल्यामुळे पूर्वी मक्यावर आढळणारी कोळीफॉल आर्मी वर्म ही कीड आता उसाकडे परावर्तित होत आहे. त्याशिवाय इतर किडींचा उसावर प्रादुर्भाव आढळत आहे. त्यामुळे भविष्यात साखर कारखानदारीवर मोठे संकट येणार आहे. केळीवरील चिलिंग, डाळिंबावरील तेल्य
.
माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकारातून अकलूज येथे शेतीच्या विविध किडी व समस्यांबद्दल परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वरूण श्रॉफ तसेच या कंपनीचे हर्षल सोनवने, जितेंद्र गोरडे, अमोल अधाळे यांनी या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. या चर्चासत्रासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सभापती दत्ता मगर यांच्यासह कृषी खात्याचे अधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते. लोणीकंद या ठिकाणी कंपनीचे प्रशिक्षण केंद्र असून, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही कंपनी कार्बन क्रेडिट क्षेत्रातही काम करत आहे.
कीड रोखण्याचे धडे मशागती, खत, पाणी, पीक व औषधांचे व्यवस्थापन, पीक पद्धती, बुरशीजन्य व कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावे लागणारे उपाय या सर्व शेतीविषयक घटकांवर सखोल चर्चा झाली. ऊस, केळी आणि डाळिंब या पिकांबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन या परिसंवादात झाले. पुढील दोन-तीन महिन्यांत पुन्हा अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, असे वरून श्रॉफ यांनी सांगितले.