![]()
गणेशोत्सव साजरा करताना संबंधित विभागाच्या सर्व परवानगी घेण्यात याव्यात. आक्षेपार्ह पोस्टर्स/बॅनर्स लावू नयेत. ध्वनिप्रदूषण कायद्याचे पालन करावे. डीजे व लेसर लाइटचा वापर टाळावा. वाहतुकीस अडथळा करू नये, अशा सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांनी दिल्या. ते मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुरुवारी गणेशोस्तवाच्या अनुषंगाने आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते. या वेळी पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, नायब तहसीलदार जयश्री स्वामी, सहायक पोलिस निरीक्षक विनोद लातूरकर, पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे, मनसेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे, चंद्रकांत पवार, वंचित बहुजन आघाडीचे अजय गाडे उपस्थित होते. डॉ. बसवराज शिवपूजे म्हणाले, सण उत्सव साजरे करताना आपण प्रशासनाला आपण सहकार्य केले आहे. यापुढेही पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सवाचा मंडप वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले पाहिजे, २४ तास सदस्य हजर ठेवा, अचानक पाऊस वादळ आले. तर मंडपाला धोका होणार नाही, याची दक्षता घ्यावी, सामाजिक बांधिलकी जोपासावी. एमएससीबीचे धनंजय पाटील, गोपनीय विभागाचे दिगंबर गेजगे यांच्यासह तालुक्यातील पोलिस पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे म्हणाले, उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळाच्या सदस्यांनी गेल्या वर्षी सहकार्य केल्यामुळे जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झाले, याची दखल विधानसभेत घेण्यात आली.ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा केल्याची सोलापूर जिल्ह्याच्या कामगिरीचे विधानसभेतही कौतुक झाले आहे. ही परंपरा पुढे चालू राहील, अशी अपेक्षा बाळगतो.डीजेशिवाय गणेशोत्सव साजरा करावा. या वेळी नारायण गोवे यांनी शहरातील रस्ते मिरवणूक मार्गावरील खड्डे दुरुस्त करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Source link
ध्वनिप्रदूषणाचा कायदा पाळा, डीजे अन् लेसरचा वापर टाळा:मंगळवेढ्यात डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपूजे यांचे मार्गदर्शन