Headlines

इंग्लिश लँग्वेज रिसोर्स सेंटरमुळे मुले बोलू लागली इंग्रजी:इंग्रजी फोबिया घालवण्यासाठी शिक्षक डॉ. संतोष गायकवाड यांनी उभारली इंग्लिश लँग्वेज लॅब‎


.

तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथील जि. प. कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीचे शिक्षक डॉ. संतोष गायकवाड यांनी कल्पक प्रयोगांच्या जोरावर ग्रामीण भागातील शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. एकेकाळी पायाभूत सुविधांची वानवा असलेल्या या शाळेला त्यांनी लोकसहभाग व आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर मॉडेल स्कूल म्हणून नावारूपास आणले आहे.

शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी डॉ. गायकवाड यांनी शासकीय निधीची वाट न पाहता लोकसहभागाचा मार्ग निवडला. पारदर्शकता जपण्यासाठी रोख रकमेऐवजी केवळ ‘वस्तू स्वरूपात’मदत स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश कंकाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास वानखडे, शिक्षणतज्ञ अमोल खंडारे यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. यातून शाळेत १० ते १५ लाख रुपयांचे अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिले. यात मुंबईत व्यवसाय करणाऱ्या युवराज पवार या माजी विद्यार्थ्याने स्वतःहून साडेपाच लाख रुपये खर्च करून दोन डिजिटल वर्गखोल्या तयार करून दिल्या. यात सिमेंट बेसवर प्रीमियम फरशी, भिंतींना टाइल्स, गुजरातवरून मागवलेले नॉन-रिफ्लेक्टिव्ह डिस्प्ले बोर्ड्स आणि दोन आधुनिक प्रोजेक्टर्स बसवण्यात आले आहेत. या माध्यमातून अडगावचे ग्रामीण विद्यार्थी थेट जगभरातील ख्यातनाम इंग्रजी लेखकांशी लाइव्ह संवादाद्वारे जोडले जात आहेत.

इंग्रजीची भीती घालवणारे पहिले ‘रिसोर्स सेंटर’ विद्यार्थ्यांमधील इंग्रजी विषयाची भीती व न्यूनगंड दूर करण्यासाठी शाळेत ‘इंग्लिश लँग्वेज लर्निंग रिसोर्स सेंटर’ अंतर्गत लँग्वेज लॅब सुरू केली. शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत महाराष्ट्राचे इंग्रजीचे मुख्य समन्वयक म्हणून काम करताना त्यांनी विकसित केलेल्या ‘इंग्लिश लँग्वेज लर्निंग किट’चा प्रभावी वापर केला जात आहे. या किटमधील विशिष्ट रचनांमुळे चुकीचे व्याकरण जुळतच नाही; केवळ व्याकरणदृष्ट्या योग्य शब्दांचीच रचना जोडली जाते.

विद्यार्थ्यांत विश्वास आला ^मी भोपाळ येथील राष्ट्रीय सादरीकरणात मांडलेला विचार शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शक ठरला. माझी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या १२ वी इंग्रजी अभ्यासक्रम समितीवर नियुक्ती झाली. ‘इंडियन रायटिंग इन इंग्लिश’चा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. रिसोर्स सेंटरमुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने इंग्रजी बोलत आहेत. – डॉ. संतोष गायकवाड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *