Headlines

शिंदेंनी फसवले नाही; 58 लाख कुणबी नोंदी त्यांच्याच काळात:मराठा समाज बांधवांची फसवणूक केल्याच्या आरोपावर भाष्य करत खासदार ज्योती वाघमारेंनी माढ्यात केले खंडन‎



बहुजन समाजाला एकत्र करून नेतृत्व करणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वैशिष्ट्य आहे. मुख्यमंत्री असताना कोणताही प्रोटोकॉल न पाळता प्रत्येक आंदोलन स्थळाला भेट देऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिंदे यांनी केला. मुख्यमंत्री पद

.

प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या वाकाव येथील निवासस्थानी भेट दिल्यानंतर माढा येथील विश्रामगृहात त्या आल्या होत्या. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा समाजाची फसवणूक केल्याच्या आरोपाचे खंडण करताना त्या म्हणाल्या की, जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. प्रामाणिक व्यक्ती ही भावनिक असते. त्यामुळे भावनेच्या भरात ते उपमुख्यमंत्र्यांवर टीका करीत आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची कोणतीही फसवणूक केली नसून ते आजही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक प्रश्नाचे चर्चेतून समाधान होते. माढ्यात गेल्यानंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी संवाद साधला.

टीका जरूर करावी, आम्ही चर्चेस तयार त्यातून प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चर्चेस तयार आहोत. आपणही चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच टीका जरूर करावी, परंतू योग्य भाषेचा वापर करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. उदय सामंत यांनी अंतरवाली सराटीत भेट टाळल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, जाणीवपूर्वक भेट टाळली नसेल, व्यस्ततेमुळे भेट झाली नसावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *