प्रतिनिधी । अमरावती/नांदगाव खंडेश्वर
.

१० दिवसांत गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून, सर्वत्र श्री गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. गणेश चतुर्थी, ऋषिपंचमी, गौरी आगमन-विसर्जन ते अनंत चतुर्दशी असा सण, उत्सव राहणार आहे. यातच यंदा बाप्पा हे १० दिवस नव्हे तर १२ दिवस आपल्यासोबत राहणार आहेत. गणेशोत्सवाला सुरुवात भद्रपद तृतीयेला होणार असून, तेव्हापासून १२ दिवसांनी अनंत चतुर्दशीची तिथी आली आहे.
गणेश चतुर्थी सोमवारी १४ सप्टेंबर रोजी आहे. अर्थात तृतीय व चतुर्थी या एकाच दिवशी आल्यामुळे याच दिवशी बाप्पांची स्थापना होणार आहे. यात बाप्पांच्या आगमनाचा एक दिवस वाढला असून, चर्तुदशी ही तिथी एक दिवस लांबल्यामुळे यंदा एकूण १२ दिवसांचा गणेशोत्सव राहणार आहे. त्यामुळे दोन दिवस जास्त बाप्पा आपल्यासोबत राहणार, याचा बालगोपालांसह सर्वांनाच आनंद झाला आहे. चतुर्थी सोमवारी १४ सप्टेंबरला सकाळी ७.०६ वाजता सुरू होत आहे. मंगळवारी १५ सप्टेंबरला स. ७.४४ वाजता समाप्त होत आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरच सोमवारी १४ सप्टेंबरला गणपती बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना, पूजा केली जाणार आहे. उदयतिथीनुसार यंदा १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
नेहमी १० ते ११ दिवसांचा गणेशोत्सवाचा कालावधी असतो. परंतु, १४ रोजी भाद्रपद तृतीयेलाच चतुर्थीची तिथी आली आहे. पौर्णिमाही शनिवार २६ पर्यंत लांबल्याने चर्तुदशी शुक्रवारी २५ सप्टेंबरला आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव १२ दिवसांचा असून, चतुर्थीपासून ते चर्तुदशी अशी पुर्ण तिथी असल्यामुळे यंदा गणेशोत्सवाचा कालावधी लांबला आहे. {तिला महालक्ष्मी असेही संबोधले जाते. शनिवारी १९ रोजी ज्येष्ठागौरी विसर्जन होणार आहे. याच दिवशी भाद्रपद शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी साजरी केली जाणार आहे. शुक्रवारी २५ रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देत यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. {सप्टेंबर हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा महिना असून, या काळात गणेश चतुर्थी (गणेशोत्सव), हरतालिका, ऋषिपंचमी आणि ज्येष्ठागौरी पूजनासह असे महत्त्वाचे सण साजरे केले जाणार आहेत.भाद्रपद शुद्ध विनायक चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणपती पूजन केले जाते. याच दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. मंगळवारी १५ सप्टेंबरला ऋषीपंचमी आहे. भाद्रपद शुद्ध पंचमीला हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी संत गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती. {गुरुवारी १७ सप्टेंबरला ज्येष्ठागौरी आगमन होणार आहे. १८ रोजी ज्येष्ठागौरी पूजन केले जाणार आहे. गौरीला गणपतीची माता पार्वतीचे रूप मानले जाते.
गणेश चतुर्थीपासून गौरी पूजन, अनंत चतुर्दशीपर्यंत सण