Headlines

गड-किल्ले पाहायचेच नाही, जपायचेही!; नळदुर्ग किल्ल्यावर तरुणाईचा संदेश:पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळाचा गड-किल्ले संवर्धनाचा उपक्रम‎



गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती आणि शौर्याचे साक्षीदार आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश देत पाथर्डी येथील सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर) स्वच्

.

कार्यकर्त्यांनी हातात हॅन्ड ग्लोव्हज, झाडू, खराटे आणि कचरा संकलनासाठीच्या बॅग घेऊन किल्ल्याच्या परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर घाण गोळा केली. संकलित केलेला कचरा एका ठिकाणी जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी किल्ल्यावर आलेल्या पर्यटक आणि नागरिकांना कचरा न टाकता गड-किल्ले स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन अभियान राबविले जाते. आतापर्यंत मंडळाने तीन किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमा राबविल्या आहेत. याशिवाय वर्षभर सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर विविध उपक्रम राबवून मंडळ सामाजिक बांधिलकी जपत आहे. मंडळाचे उत्सव समिती अध्यक्ष गोपालसिंग शेखावत म्हणाले, सुवर्णयुग तरुण मंडळ केवळ उत्सव साजरे करणारे मंडळ नसून सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ आहे. गड-किल्ले आपल्या इतिहासाचे आणि शौर्याचे साक्षीदार असल्याने त्यांचे संवर्धन करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तरुणांनी सोशल मीडियावर इतिहास पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष गड-किल्ल्यांवर जाऊन संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा. दिगंबर जोजारे यांनी भविष्यातही गड-किल्ले संवर्धन, स्वच्छता, पर्यावरण आणि समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची ग्वाही दिली.

उत्सवापुरते नाही, सामाजिक बांधिलकीसाठीही मैदानात! सुवर्णयुग तरुण मंडळ वर्षभर विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, जनजागृती व समाजप्रबोधनाचा संदेश देतानाच सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढविण्याची भूमिका मंडळाने कायम ठेवली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *