![]()
केतन अग्रवाल खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी बीडचा मूळ रहिवासी असलेल्या रितेश हंगे याला शुक्रवारी रात्री अटक केली. खुनाच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. रितेशला न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासानुसार, रितेश हा चेतन चौधरीचा मित्र असून तो चेतन व सियाच्या संपर्कात होता. केतनच्या खुनाच्या नियोजनाबाबत चेतन व सिया यांनी रितेशसोबत चर्चा केल्याचे तपासात समोर आले आहे. या दोघांनी रितेशला लोहगडावर फिरण्यासाठी जाण्याचा आग्रह केला होता. मात्र, १८ जून रोजी रितेश लोहगडावर गेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. खूनानंतर चेतनने सर्वप्रथम रितेशची भेट घेतल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. सियानेदेखील रितेशशी संपर्क साधून संवाद साधल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. रितेश मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून होता संपर्कात रितेश मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चेतनच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. केतनच्या खुनाच्या कटाच्या पार्श्वभूमीवर चेतन, सिया आणि रितेश यांच्यात झालेला संपर्क, त्यांच्यातील संवाद तसेच खुनापूर्वी व खुनानंतरच्या हालचालींची माहिती पोलिस तपासत आहेत. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी रितेशला यापूर्वी ताब्यात घेऊन चौकशी केली होती.
Source link
केतन अग्रवाल खून प्रकरणात बीडच्या रितेश हंगेला अटक:चेतन-सियाने रितेशसोबत खुनाचे नियोजन केल्याचा पोलिसांचा दावा