लोकशाही वाचवण्यासाठी देशात दुसरा स्वातंत्र्य संग्राम लढावा लागेल:खासगी कंपनीच्या हाती मतदार याद्या देऊन 3 कोटी मतांवर दरोडा -हर्षवर्धन सपकाळ
“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा खरा मालक सर्वसामान्य नागरिक ठरला होता. मात्र, आज देशात जनतेचे राज्य नसून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार निवडक उद्योगपतींसाठी व्यवस्था चालवत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मतांमध्ये खुलेआम चोरी होत असून लोकशाहीचा मूळ गाभाच धोक्यात आला आहे. त्यामुळे केवळ निषेध नोंदवून चालणार नाही, तर भारताची लोकशाही आणि संविधानाने दिलेला मताधिकार…