पुण्यात दहीहंडी उत्सवानंतर भीषण दुर्घटना!:मंडपाची लोखंडी कमान उतरवताना रॉड डोक्यावर पडला; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर मंडप आणि लोखंडी स्ट्रक्चर उतरवण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जुन्या सांगवी परिसरात घडली. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जुन्या सांगवीतील लेन क्रमांक 2 येथे विघ्नहर्ता मित्र मंडळ आणि विघ्नहर्ता दहीहंडी…