Headlines

मतदार यादीपूर्ण करा, कर्जमाफी वीज माफीचे आश्वासन सरकारने पाळले:राहुरीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन‎



विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम यशस्वी करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. ही केवळ प्रशासनाची मोहीम नसून, मतदार यादी त्रुटीरहित करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या कामात निष्काळजीपणा केल्यास मतदारांचे नाव कमी होऊ शक

.

मंत्री विखे पाटील यांनी महायुती सरकारच्या निर्णयांचा पाढा वाचला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी मिळाली असून जुलैअखेर रकमा जमा होतील. तसेच ४८ हजार कोटींची वीज बिले माफ करून सरकारने शब्द पाळला आहे. दूध भेसळीवरील कारवाईमुळे दुष्काळातही दुधाचे भाव टिकून आहेत. राहुरी मतदारसंघात ५५ टक्के काम झाल्याबद्दल त्यांनी वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या, तसेच आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार अक्षय कर्डिले यांच्यात काम पूर्ण करण्याची स्पर्धा लागली पाहिजे, असे ते म्हणाले.

नदीजोड प्रकल्पातून ७८ टीएमसी पाणी वळवले जाणार आहे. मुळा धरणात १५ टीएमसी पाणी आणण्याचा प्रयत्न आहे. या ८४ हजार कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आराखडा डिसेंबरपर्यंत तयार होईल. तसेच मानोरी प्रकल्पासाठी ७८ कोटी मंजूर झाले असून वांबोरी चारीसाठी निधी दिला आहे. बैठकीत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिल परताव्याचा मुद्दा मांडला, तर आमदार अक्षय कर्डिले यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. युरिया खताची लिंकिंग सक्ती थांबवून ४८० मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याची माहिती कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी दिली. तहसीलदार डॉ. अमित पवार यांनी टंचाई नियोजनाची माहिती दिली. आषाढी एकादशीनंतर जलजीवन मिशन व इतर तक्रारींबाबत तालुकावार बैठका घेतल्या जातील, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक विनायक देशमुख यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *