![]()
अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नरेंद्र फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे नुकतेच उद्घाटन झाले. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे सुरू झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धेचे उद
.
प्रास्ताविकात बापट म्हणाले, या स्पर्धेसाठी आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बिहार, जम्मू-काश्मीर तसेच महाराष्ट्र राज्यातून ३८० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत अवघ्या पाच वर्षांच्या बालकांपासून ते ८३ वर्षांच्या ज्येष्ठ खेळाडूंपर्यंत विविध वयोगटातील बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले, नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या फिडे रेटेड क्लासिक स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून विचारशक्ती, संयम आणि नियोजन यांची कसोटी आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. कृष्णा भंडलकर यांनी संघटनेचे कौतुक करत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले. दरम्यान, या स्पर्धेस शहरातील खेळाडूंचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही खेळाडूंना चमकण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे खेळाडूंचा स्पर्धेतील सहभाग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.शहराबरोबरच राज्यातील विविध जिल्हे आणि राज्याबाहेरुनही खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.