Headlines

Chinchner Nimb Mahavitaran Cable Theft Case


सातारा शहरात थकीत वीजबिलामुळे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला शासकीय कर्तव्य बजावण्यापासून रोखून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना नेले (ता. सातारा) येथे घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल क

.

महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ तथा लाईनमन अमोल शंकर घुले (वय 39, रा. गोडोली, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास ते थकीत बिलापोटी संबंधित घरातील मीटरचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते.

त्या वेळी दत्तात्रय ज्ञानदेव जाधव आणि अजय जिजाबा जाधव या दोघांनी वीजजोडणी तोडण्यास कडाडून विरोध केला. दोघांनी घुले यांच्याशी वाद घालत शासकीय कामात अडथळा आणला, तसेच त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून महिला पोलिस हवालदार कुंभार पुढील तपास करत आहेत.

महावितरणच्या रोहित्रामधून 60 किलो तांब्याची तार चोराने पळवली

तर शहरातील दुसऱ्या एका घटनेत महावितरणच्या विद्युत यंत्रणेतील तांब्याच्या महागड्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. चिंचणेर निंब येथील गोटेमाळ शिवारातील 100 केव्हीए क्षमतेच्या डीपीमधून तब्बल 50 ते 60 किलो वजनाची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या चोरीमुळे महावितरणचे सुमारे 25 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

याप्रकरणी महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ तथा लाईनमन पुरुषोत्तम नारायण जाधव (वय 38, रा. कोडोली) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोटेमाळ शिवारातील डीपी क्रमांक 1881365 मधून तांब्याची तार गायब झाल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांच्या पाहणीत आढळले. त्यानंतर तातडीने पोलिसांत धाव घेण्यात आली. चोरट्यांनी डीपीमध्ये प्रवेश करून ही तार कशी आणि कशाच्या साहाय्याने काढली, याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिस हवालदार पिसाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हे ही वृत्त वाचा भंडाऱ्याची देणगी गोळा करताना हल्ला:दारूसाठी पैसे न दिल्याने 22 हजारांची रोकड पळवली

साताऱ्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. भंडाऱ्यासाठी नागरिकांकडून देणगी स्वीकारत असलेल्या व्यक्तीला दारूसाठी पैसे मागून, पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याची घटना सातारा शहरातील गोडोली येथील समाज मंदिर परिसरात घडली. या प्रकारात हल्लेखोराने संबंधिताच्या गळ्यातील हँडबॅग जबरदस्तीने हिसकावून घेत त्यातील 22 हजार रुपयांची रोकड लंपास केली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.