Headlines

4.5 लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याचं CET सेलने मान्य केलं:850 कोटींच्या कंत्राटात मोठा मलिदा; रोहित पवारांचा थेट आरोप, कारवाईची मागणी




महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET Cell) कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील तब्बल साडेचार लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याची बाब खुद्द सीईटी सेलने मान्य केल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण परीक्षा पद्धतीत आणि कंत्राटात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संबंधित एज्युटेक कंपनी, तिचे संचालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लागेबांधे पुराव्यासह मांडत या संपूर्ण गैरप्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. कंपन्यांचे संचालक एकमेकांशी संबंधित; पुराव्यासह माहिती समोर सीईटी परीक्षेचे काम पाहणाऱ्या कंपनीच्या कारभारावर बोट ठेवताना रोहित पवार म्हणाले, “एड्यूस्पार्क इंटरनॅशनलचे संचालक रुस्तम इराणी, स्किल फ्री कन्सल्टिंगचे संचालक राहिलेले अब्दुल हाय आणि इंडस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक देवेन पांड्या हे तिघेही ‘इंडस इंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट लिमिटेड’ या एकाच कंपनीचे संचालक राहिलेले आहेत. हे तिघेही एकमेकांना चांगले ओळखतात.” “सीईटी सेल वस्तुस्थिती लपवण्यासाठी जनतेसमोर केवळ सोयीची माहिती आणत आहे. मात्र, आम्ही हवेत आरोप न करता अधिकृत कागदपत्रांच्या आणि पुराव्यांच्या आधारे हा गैरव्यवहार समोर आणला आहे.” 850 कोटींचे कंत्राट, 50 कोटींत होणारे काम एवढे महाग का? रोहित पवारांनी कंत्राटाच्या रकमेवर आणि मलिदा लाटण्याच्या पद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले, “संबंधित कंपनी अत्यंत ताकदवान असून देशभर दरवर्षी 12 ते 15 हजार कोटींची कामे करते. महाराष्ट्र शासनाकडूनही तिला तब्बल 700 ते 800 कोटी रुपयांची कामे दिली गेली आहेत.” ऑफलाइन परीक्षा स्वस्त होती “पूर्वी दहावी-बारावीप्रमाणे सीईटीची परीक्षा मॅन्युअली (ऑफलाइन) घेतली जायची. तेव्हा कोणत्याही तक्रारी येत नव्हत्या आणि केवळ 50 कोटी रुपयांत संपूर्ण प्रक्रिया पार पडायची. मात्र, 50 कोटींचे काम असताना 850 कोटी रुपये का खर्च करण्यात आले? यातून अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी मलिदा लाटल्याचा दाट संशय आहे.” तत्कालीन असोत वा आत्ताचे, दोषींवर गुन्हे दाखल करा कंत्राट देण्याच्या कालावधीवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रोहित पवारांनी निःपक्षपाती कारवाईची मागणी केली. “2019 मध्ये हे काम निघाले तेव्हा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री कोण होते? तेव्हा उदय सामंत मंत्री होते आणि सरकार आमचे होते. मात्र, त्यावेळच्या मंत्र्यांवर एका भाजप नेत्याचा मोठा दबाव होता. त्यानंतर २०२३-२४ मध्ये याच कंपनीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली.” “मंत्री आमचे असोत वा आत्ताचे सत्ताधारी, ज्यांनी ज्यांनी चुका केल्या आणि जे अधिकारी याला जबाबदार आहेत, त्या सर्वांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला हा खेळ थांबला पाहिजे.” पोलिस FIR नोंदवणार नाहीत, राजकीय दबाव मोठा आपण स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी जाणार असल्याचे सांगत ते म्हणाले, “मी जेव्हा या गैरप्रकाराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन जाईन, तेव्हा पोलीस माझी एफआयआर (FIR) नोंदवून घेणार नाहीत. कारण पोलीस आणि सीईटी सेलवर सत्ताधाऱ्यांचा मोठा दबाव आहे. ही एफआयआर केवळ रोहित पवारची नसून लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्राध्यापकांची आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल केला पाहिजे.” गुणवत्ता घसरली; फेरपरीक्षेची मागणी सीओईपी (COEP) सारख्या नामांकित शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असलेले जोशी सर खास बेंगळुरूहून या लढ्यासाठी मुंबईत आले असल्याचा उल्लेख रोहित पवारांनी केला. गैरमार्गाने आणि पैसे देऊन अयोग्य विद्यार्थी नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवत असल्याने ‘सीओईपी’सारख्या अग्रगण्य संस्थांची शैक्षणिक गुणवत्ता खालावत असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे. बोगस पद्धतीने प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढून, गुणवत्ताधारक आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी प्रवेश प्रक्रिया फेरतपासणी करावी, अशी आग्रही मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. हेही वाचा… जिवंत राहिलो तर रविवारी मोर्चात नक्की सहभागी होणार!: मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची पत्रकार परिषद; डीजे, रोजगार आणि ‘सिटीझन ॲक्टिव्हिझम’वर परखड भाष्य टिळक रस्त्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासांत सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी पत्रकार परिषद घेत आपली आक्रमक आणि रोखठोक भूमिका पुन्हा एकदा मांडली. “माझ्यावर झालेला भ्याड हल्ला ही वैचारिक दिवाळखोरी आहे. नरेंद्र दाभोलकरांसारख्या विचारवंतांचा सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर खून झाला होता, त्यामुळे पुढे काय होईल हे सांगता येत नाही; पण जर मी जिवंत राहिलो आणि जाण्याजोग्या परिस्थितीत असेन, तर रविवारी पुण्यात निघणाऱ्या मोर्चात नक्की सहभागी होईन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पोलीस संरक्षणाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, मात्र पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार उघड्यावर पत्रकार परिषद न घेता बंदिस्त जागेत माध्यमांशी संवाद साधला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *