Headlines

Agripada Mumbai Crime: Husband Murders Wife Then Commits Suicide


मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील कालापानी चौकी भागात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या अवघ्या 19 वर्षांच्या पत्नीची निर्घृण हत्या करून स्वतःचेही आयुष्य संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

.

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रीपाडा येथे राहणारा पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून सतत वाद सुरू होते. आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांच्यातील हा वाद अचानक विकोपाला गेला. रागाच्या भरात पतीने स्वयंपाकघरातील धारदार चाकूने पत्नी जन्नतच्या गळ्यावर वार करून तिचा गळा चिरला.

पतीचा उपचारादरम्यान मृत्यू

पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर पतीने त्याच चाकूने स्वतःचाही गळा चिरून घेतला. या भीषण हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला तातडीने जवळच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवली.

आग्रीपाडा पोलिसांकडून तपास सुरू

या दुहेरी घटनेची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घरगुती वादाचे नेमके कारण काय होते आणि ही हिंसक घटना कशामुळे घडली, याचा पोलिस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अमरावतीमध्ये कॉलेज तरुणीची चाकूने भोसकून हत्या

अमरावती शहरातील अंबाविहारातील बीएससी प्रथम वर्षाची साडे सतरा वर्षीय विद्यार्थिनीचा तिचा मित्र आनंद भडने गळा चिरून, शरीरावर चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी 3 सप्टेंबरला रवी नगरातील हनुमान मंदिर चौकाजवळच घडली. त्या पूर्वी तिने आनंद त्रास देत असल्याचे त्यांच्या कॉमन फ्रेंडला सांगितले होते. हा मित्र त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतानाच आनंदने एकतर्फी प्रेमातून तिच्यावर हल्ला केला.त्यात मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान मारेकऱ्याला रात्री साडेनऊ वाजता गोंदियातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

आनंद नंदकिशोर भड (22, रा. पोही ता. मूर्तिजापूर) असे हल्लेखोराचे नाव आहे. आनंद, मृत तरुणीची ओळख होती. दोन महिन्यांपासून तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. याचा राग मनात धरून ‘माझ्याशी बोल’ असे म्हणत तो त्रास देत होता.गुरुवारी महाविद्यालयात जाण्यास तरुणी दुचाकीवरून निघाली. घरापासून एक ते दीड कि.मी.वर रवी नगरातील हनुमान मंदिर चौकात तो दुचाकीवरून तिथे आला. त्याने वाद घालत चाकू काढून तिच्या गळ्यावर वार केला. त्यात तिला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याने तिच्या छातीवर दोन, पोटावर तीन वार केले.रक्तबंबाळ तरुणीला रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. हे ही वृत्त वाचा

ठाण्यामध्ये स्कूटीच्या डिकीतून साडेपाच कोटींचे ‘एमडी’ जप्त:दोन वेगवेगळ्या कारवाईत 4 तस्करांना पोलिसांनी केली अटक

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (गुन्हे शाखा) ड्रग्ज तस्करांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करत आंतरजिल्हा नेटवर्कवर धडक कारवाई केली आहे. घोडबंदर रोड आणि कोपरी परिसरात मारलेल्या दोन वेगवेगळ्या धाडींमध्ये पोलिसांनी तब्बल ५ कोटी ६६ लाख ३७ हजार २९० रुपयांचे ‘एमडी’ (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले असून, याप्रकरणी ४ मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.