![]()
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2024 सत्रातील संगीत अलंकार (तबला) परीक्षेत जगमित्र रामलिंग लिंगाडे यांनी राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीबद्दल अखिल भारतीय गांधर्व मंडळातर्फे त्यांना श्री गुरुदेवजी पटवर्धन पुरस्कार, उस्ताद इनामअली पुरस्कार तसेच कै. विष्णू मिकाजी माईणकर पुरस्कार, हरी ओम ट्रस्ट वाद्य प्रथम पुरस्कार आणि पं. सतीशचंद्र चौधरी स्मृती पुरस्कार असे चार प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती मंडळाचे कुलसचिव विश्वास जाधव यांनी कळवली आहे. अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाचा दीक्षांत समारंभ 22 ऑगस्ट 2026 रोजी नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला असून, या समारंभात जगमित्र लिंगाडे यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. जगमित्र लिंगाडे यांनी तबल्याचे प्राथमिक शिक्षण आपल्या वडिलांकडून रामलिंग लिंगाडे यांच्याकडे घेतले. त्यांनंतर स्वर्गीय पं. सतीशचंद्र चौधरी यांच्याकडे घेतले त्यानंतर त्यांनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त पंडित सुरेश तळवलकर आणि पंडित सत्यजित तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्याचे उच्च शिक्षण चालू आहे. त्यांच्या अथक परिश्रम, सातत्यपूर्ण रियाज आणि गुरूंच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावर हे मानाचे यश मिळविले आहे. जगमित्र लिंगाडे यांच्या या यशाबद्दल संगीत क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Source link
जगमित्र लिंगाडे 'संगीत अलंकार' परीक्षेत देशात प्रथम:अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे चार प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर