Headlines

Satara Sex Racket Bust; Crime Filed Against 3 Women


कोडोली एमआयडीसी परिसरातील जानाई-मळाई सोसायटीत एका घरातून कथित देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केलेल्या कारवाईनंतर 3 महिलांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल

.

3 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक ज्योती बैनवाड यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित महिला देहव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर उदरनिर्वाह करीत असल्याचा तसेच इतर महिलांना ग्राहकांसाठी देहव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी 1,500 रुपये रोख, सुमारे पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. तीन महिलांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलमांसह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेचे वय 33 वर्षे असून ती पुणे परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तपास सुरू आहे. साताऱ्यात विवाहितेवर जबरदस्तीचा प्रयत्न

शिवथर परिसरात घरात घुसून 29 वर्षीय विवाहितेवर जबरदस्ती केल्याचा आरोप करत एका तरुणाविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराला विरोध केल्यानंतर संबंधित महिलेला तसेच तिच्या मुलांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय घटनेची माहिती पतीला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांत शुक्राचार्य साबळे (रा. शिवथर) याने महिलेच्या घरात प्रवेश करून तिच्यावर जबरदस्ती केली. महिलेने विरोध केल्यानंतर त्याने शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी तिच्या मुलांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार साबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

हे ही वृत्त वाचा

साताऱ्यात महावितरणच्या कामात अडथळा आणत कर्मचाऱ्याला शिवीगाळ:चिंचणेर निंब येथे रोहित्रामधून 60 किलो तांब्याची तार चोरीला

सातारा शहरात थकीत वीजबिलामुळे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला शासकीय कर्तव्य बजावण्यापासून रोखून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना नेले (ता. सातारा) येथे घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.