![]()
दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू झाली आहे. १८ पैकी १२ संचालकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठरावासाठी बैठक घेण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे. शुक्रवारी सायंकाळी डीपीसीची बैठक संपल्यानंतर हे पत्र सादर करण्यात आले. यामुळे दर्यापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या वेगवान हालचाली सुरू आहेत. बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक मे २०२३ मध्ये पार पडली होती. विद्यमान सभापती सुनील गावंडे हे संचालकांना विश्वासात न घेता कामकाज करत असल्याचा आरोप या १२ संचालकांनी केला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराजी वाढल्याने अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला. अविश्वास ठरावाच्या पत्रावर उपसभापती राजू कराळे, ज्येष्ठ संचालक साहेबराव भदे, बांधकाम सभापती राजेश खेडकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा संचालिका कांचनमाला गावंडे, गजानन देवतळे, अडते व्यापारी संचालक प्रभाकर तराळ, राजेश राठी, अनिल भारसाकळे, हमाल-मापारी संचालक आसिफभाई, माजी सभापती तथा विद्यमान संचालक बाळासाहेब वानखडे, मनीष कोरपे आणि सुनील डिके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले की, दर्यापूर कृउबासच्या सभापतींवर अविश्वास प्रस्ताव आणण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. सोमवारी याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून रितसर प्रस्ताव मागविला जाईल आणि त्यानंतर पुढील कारवाई सुरू केली जाईल.
Source link
दर्यापूर कृउबास सभापतींविरोधात अविश्वासाची तयारी:18 पैकी 12 संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र