भुजबळांनी रस्त्यावर उतरावं!:विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, दादा भुसेंवर म्हणाले- शिक्षणमंत्र्यांचे अधिकार काढले, मग मंत्री का ठेवता?
राज्यातील ओबीसी समाजाच्या प्रश्नांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ओबीसी आरक्षण, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, शिष्यवृत्ती आणि स्वाधार योजनेच्या थकीत रकमा यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांनी आता केवळ सरकारमध्ये राहून भूमिका मांडण्याऐवजी ओबीसींच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन केले. “मंत्रिमंडळात राहून तुमच्या डोळ्यादेखत ओबीसींचा वाटोळा होत…