Headlines

BJP Leader Navnath Ban Slams Sanjay Raut; Calls UBT Private Limited


जनभावना आणि उबाठाचा काहीही संबंध राहिलेला नाही. तुमचा पक्ष हा केवळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा झाला आहे. तुम्ही तिघे सोडले तर तुमच्या पक्षात कोणीही उरलेले नाही. तुमचा पक्ष केवळ ‘मातोश्री’पुरता मर्यादित असल्याने जनभावना काय असतात, हे तुम्हाला कधीही

.

नवनाथ बन म्हणाले की, जुलूसचे डीजे रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असले तरी संजय राऊतांना काही फरक पडत नाही; तुम्ही दिमागी नक्षल आहात. संजय राऊत यांना नवरात्रात झोप येत नाही, कारण त्यावेळी देवीचा जागर सुरू असतो. हिंदू धर्माचा जागर सुरू झाला की राऊतांची झोप उडतेच. ज्या दिवशी जुलूस निघतो, त्या दिवशी मोठ्या आवाजात वाजणारा डीजे तुम्हाला चालतो. बकरी ईदच्या वेळी कृत्रिम पद्धतीने सण साजरा कर’ असे सांगण्याची हिंमत तुम्ही दाखवत नाही; केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच तुम्हाला नियमांची आठवण होते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी नवरात्रोत्सवाला विरोध केला होता, तेव्हा त्यांच्या पक्षाची काय अवस्था झाली हे सर्वांनी पाहिले आहे. तुम्ही जर हिंदू सणांना असाच विरोध करणार असाल, तर तुमच्या पक्षाचे काय होईल याचा विचार करा.

मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा

नवनाथ बन म्हणाले की, मराठा समाजाच्या आंदोलनावर बोलण्याचा संजय राऊत यांना कोणताही नैतिक अधिकार नाही; कारण मराठा समाजाच्या मूक मोर्चाची मुका मोर्चा अशी टवाळी करण्याचे पाप त्यांनी केले होते. आज मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्यासाठी महायुतीचे नेते स्वतः आंतरवली सराटीमध्ये जात आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ऐतिहासिक काम देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते आरक्षण न्यायालयात टिकवू शकले नाहीत, हा त्यांचा नाकर्तेपणा होता. आज मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषणाची जी वेळ आली आहे, ती केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आली आहे. मात्र, देवाभाऊ मराठा समाजासोबत सक्षमपणे उभे आहेत, त्यामुळे जरांगे यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही.

पेपरफुटी प्रकरणी कारवाई स्पष्ट

नवनाथ बन म्हणाले की, एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात सरकारने तत्काळ गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलेले नाही. उलट महाविकास आघाडीच्या काळात टीईटी आणि म्हाडाचा पेपर फुटला होता, तेव्हा कारवाई करण्याची हिंमत मविआ सरकारने दाखवली नव्हती. आम्ही मात्र कोणाचेही संबंध समोर आले तरी कोणालाही पाठीशी घालणार नाही, कठोर कारवाई केली जाईल; कारण देवाभाऊ कडक कारवाई करतात.

हे ही वृत्त वाचा

MPSC पेपरफुटीत सरकारी पाठिंबा, मंत्री झिरवळांचीही चौकशी करा!:संजय राऊतांचा गंभीर आरोप, झिरवाळांच्या OSDचे आरोपीच्या घरातील वास्तव्य चर्चेत

एमपीएससी (MPSC) पेपरफुटीचे धागेदोरे आता थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. सरकारी यंत्रणेच्या पाठिंब्याशिवाय आणि आशीर्वादाशिवाय असे पेपर फुटणे शक्यच नाही, असे सांगत त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या चौकशीची थेट मागणी केली आहे. झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) मागील महिनाभरापासून बेपत्ता असून, ते पेपरफुटीतील मुख्य आरोपीच्या घरात भाड्याने राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राऊतांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.