Headlines

Navi Mumbai Uran Minor Girl Rape Case; POCSO Filed Against Shubham Mhatre


उरण परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उरण पोलिसांनी २० वर्षीय तरुणाविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शुभम म्हात्रे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव अस

.

नेमकं प्रकरण काय आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाची पीडित अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर आरोपीने मुलीला आपल्या घरी बोलावले. याचदरम्यान तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर काही दिवसांनी अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागले. त्रास वाढल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीदरम्यान ती अंदाजे एक महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.

अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच उरण पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलिसांनी पीडित मुलीकडे विचारपूस केली असता, तिने शुभम म्हात्रे याने आपल्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पीडित मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने या प्रकरणात पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

पुढील तपास सुरू आहे

या प्रकरणाचा पुढील तपास उरण पोलीस करत असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती, आरोपी आणि पीडितेचे संबंध तसेच अत्याचाराच्या घटनेबाबत अधिक माहिती तपासातून समोर येणार आहे. पोलिसांकडून पीडित मुलीची वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या या घटनेमुळे उरण परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा आणि तिच्या मानसिक व शारीरिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा..

नागपुरात संतापजनक घटना! दोन मुलांसमोर पत्नीला मारहाण:उपचारादरम्यान मृत्यू; डान्स क्लासला जाण्यावरून वादाचा भयंकर शेवट

डान्स क्लासला जाण्यावरून झालेल्या घरगुती वादाचे रुपांतर इतके टोकाला गेले की, एका महिलेचा जीव गेला. नागपुरात 38 वर्षीय यामिनी कृष्ण लाल यादव यांचा पतीने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती कृष्ण लाल यादव (41) याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.