Headlines

मोदींचा प्रश्न- जनतेशी कसे बोलावे, टिप्स द्या:शिक्षिकेचे उत्तर- कॉन्फिडन्स हवा; पंतप्रधानांची राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 48 शिक्षकांशी संवाद साधला. या शिक्षकांना आजच हा पुरस्कार दिला जाईल. पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब चॅनलवर 5 मिनिटांचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला. त्यात पंतप्रधानांनी एका महिला शिक्षिकेला विचारले की, तुम्ही मुलांना पब्लिक स्पीकिंग शिकवता. मी तुमच्याकडचा विद्यार्थी असेन आणि मला एक चांगला वक्ता बनायचे असेल,…

Read More

दर 6 महिन्यांनी रुग्णालयांचे फायर ऑडिट होणार:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची घोषणा; छत्रपती संभाजीनगर दुर्घटनेनंतर सरकारचा निर्णय

राज्यातील रुग्णालयांमध्ये आगीसारख्या दुर्घटना घडू नयेत आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांसह कर्मचाऱ्यांची सुरक्षितपणे सुटका करता यावी, यासाठी आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे नियमित अग्निसुरक्षा परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील 4 दिवसांत ही कार्यपद्धती जारी केली जाणार असून, त्यानंतर दर 6 महिन्यांनी रुग्णालयांमधील…

Read More

Sanjay Raut Toxic Test Allegation; Pune DJ Ban & MPSC Row Controversy

पुण्यात डीजे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी बापट यांच्या भूमिकेला पुणेकरांचा पाठिंबा असल्याचा . राऊत म्हणाले की, सध्या मुख्य प्रश्न डीजेच्या आवाजामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा आहे. हा आवाज भूकंपासारखे हादरे देणारा असल्याची टीका त्यांनी केली….

Read More

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 8 वा दिवस:वैद्यकीय उपचार त्यागल्याने मराठा आंदोलकांची चिंता वाढली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक उपोषणस्थळी दाखल झाले असून आंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी काल रात्रीपासून वैद्यकीय उपचार, सलाईन आणि पाणी घेण्यास पुन्हा नकार दिल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांची चिंता अधिक वाढली आहे. 58 लाख…

Read More

केरळमध्ये काँग्रेसच्या महिला आमदाराशी धक्काबुक्की:कार्यकर्त्यांनी हात पिरगळले; राम्या हरिदास रुग्णालयात, 7 जणांवर FIR

केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील चिरयिनकीझु येथे शुक्रवारी रात्री काँग्रेस आमदार राम्या हरिदास आणि स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांत वाद झाला. या वादाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यात राम्याला काही जण मारहाण करताना दिसत आहेत. लोकांनी आमदाराचा हात पाठीमागे मुरगळला. व्हिडिओमध्ये आमदार आपला हात सोडायला सांगताना दिसत आहेत आणि समोर असलेल्या व्यक्तीला विचारतात की तो कोण आहे. या…

Read More

Maharashtra Dahi Handi Celebration 2026

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राज्यभरात आज दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी आयोजक आणि मंडळांकडून निष्णात गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय, अनेक नामांकित हंड्यांच्या ठिकाणी मराठी Source link

Read More

पंकज त्रिपाठी कधीकाळी हॉटेलमध्ये करत होते काम:मनोज वाजपेयींची चप्पल घेतली होती ठेवून, आंदोलनामुळे 7 दिवस तुरुंगासही भोगला

ज्येष्ठ अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. पंकज त्रिपाठी अशा कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांनी कोणत्याही फिल्मी पार्श्वभूमीशिवाय स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड गावातून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापर्यंत पोहोचलेल्या पंकज यांनी चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिकांपासून सुरुवात केली आणि सध्या ते हिंदी सिनेमातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी ते एक आहेत. पंकज यांच्या…

Read More

महाराष्ट्रात पावसाची उघडीप कायम:पुढील चार दिवस कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट नाही, कोकणात हलक्या सरी बरसण्याचा अंदाज

महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असून पावसाने पुन्हा एकदा ब्रेक घेतला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्या, तरी राज्यात कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. आज, कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस हवामानात मोठा बदल होणार नसून, काही भागांत दमट तर काही ठिकाणी कोरडे हवामान…

Read More

केरळमध्ये ट्रकला धडकली कार, 8 ठार:मृतांत तामिळनाडूच्या अभियांत्रिकी कॉलेजचे विद्यार्थी; गाडी कापून मृतदेह काढले बाहेर

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा एक कार महामार्गावर उभ्या असलेल्या लॉरी अर्थात ट्रकला धडकली. या अपघातात कारमधील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री 11:40 च्या सुमारास कापामंगलम येथील पनंबिकुन्नू येथे झाला. पोलिसांनी सांगितले की, कार तामिळनाडू क्रमांकाची होती. त्यातील बहुताश जण दिंडीगुल येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे सांगितले…

Read More

आरक्षणासाठी जामखेडची बाजारपेठ ठप्प; आंदोलनाला सर्व समाजांची साथ:व्यापारी, व्यावसायिक, नागरिकांचा प्रतिसाद; मुस्लिम समाजाचाही पाठिंबा‎

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड शहर व तालुक्यात शुक्रवारी बंद पाळण्यात आला. अखंड मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी, व्यावसायिक तसेच नागरिकांनी दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी प्रतिष्ठाने आणि विविध व्यावसायिक आस्थापना…

Read More