![]()
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी (३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघ) झालेल्या निवडणुकीचे निकाल आणि कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “भाजपचे दिवस आता भरले असून, त्यांचा जायचा वेळ आला आहे,” असा घणाघाती हल्ला वडेट्टीवार यांनी केला आहे. ‘सुशिक्षित मतदारांनी भाजपला पळवून लावण्याचा निर्णय घेतलाय’ विधान परिषदेच्या निकालाचे विश्लेषण करताना वडेट्टीवार म्हणाले, “या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, भारतीय जनता पक्षाचे आता दिवस भरले आहेत. यांची जायची वेळ आली आहे. विशेषतः या देशातील जो सुशिक्षित आणि शिकलेला मतदार (Literate Person) आहे, त्याने आता ठरवले आहे की या लोकांना पळवून लावणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर हे लोक देश बरबाद करून सोडतील आणि देशाला विकून खातील, हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे.” ‘मोदींचे जाणे आणि राहुल गांधींचे येणे निश्चित’ या निकालांचा राष्ट्रीय राजकारणाशी संदर्भ जोडताना त्यांनी एक मोठा दावा केला. “आता भाजपचे जाणे निश्चित आहे, मोदींचे जाणे निश्चित आहे. देशामध्ये बदल होणार असून राहुल गांधींचे येणे निश्चित आहे, हाच मोठा संदेश या निवडणुकीच्या निकालातून समोर आला आहे,” असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. ‘पाचही जागा मविआ जिंकणार’ पाचही जागांच्या निकालाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, “आता चित्र अगदी स्पष्ट दिसत आहे. या पाचही जागांवर महाविकास आघाडीच (मविआ) जिंकणार आहे. जे लोक छाती ठोकून आणि ताणून मोठ्या बढाया मारत होते, त्यांना आता या निकालावरून समजले असेल की राज्यात नेमका कशाचा माहौल आहे आणि कल कुणीकडे गेला आहे.” ———————– हेही वाचा.. मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 23 हजार 360 मतांनी आघाडीवर: 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर विधान परिषदेच्या 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबरला झालेल्या मतदानाची मोजणी 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू झाली. विधान परिषदेच्या या निवडणुकीत मतपत्रिकांवर प्राधान्यक्रमाने मतदान होते. त्यामुळे मतमोजणी संथगतीने सुरू होती. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात रात्री 3 वाजता दीड फेरी पूर्ण झाली. त्यावेळी 1,01,519 मतांची मोजणी झाली होती. त्यापैकी 93,136 मते वैध ठरली, तर 8383 मते बाद झाली. यापैकी मविआ शरद पवार गटाचे डॉ प्रताप पाटील यांना 39,753 मते मिळाली होती, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांना 29,750 मते मिळाली होती. सविस्तर वाचा
Source link
विधान परिषद निकालावरून विजय वडेट्टीवारांचा घणाघात:म्हणाले- भाजपचे दिवस भरलेत, मोदींचे जाणं अन् राहुल गांधींचं येणं निश्चित