Headlines

एकनाथ शिंदे म्हणजे काही विनोबा भावे नाहीत:एखादा हनुमान येईल अन् त्यांची दाढी जाळेल, पक्ष फोडणारे राजकीय सिरीयल किलर अन् रेपिस्ट- संजय राऊत




एकनाथ शिंदे यांना दाढी असली म्हणजे ते काही आचार्य विनोबा भावे नाहीत. ते बोलतील तेच सत्य आणि नैतिकतेचे आहे असे नाही. उद्धव ठाकरेंच्या नावावर आणि मशालीवर निवडून आलेले सहा आमदार 50-50 कोटी रुपयांना विकत घेतले गेले. या गद्दारीत कसले शौर्य आहे? हे मतदान चोरलेल्या धनुष्यबाणाला नव्हे, तर उद्धव ठाकरेंना झाले होते. एखादा हनुमान येईल आणि ही दाढी जाळून टाकेल, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी आपली नैतिकता अमित शहा यांच्या पायी गहाण ठेवली आहे. जे सहा लोक आम्हाला सोडून गेले, त्यांना ‘गद्दार’ हा शब्दही कमी पडेल. समाजात अत्याचार आणि खून जसे गुन्हे आहेत, तसाच या 6 गद्दारांना शिंदे गटात विलीन करून घेण्याचा प्रकार आहे. राज्यात लोकांना खायला अन्न आणि प्यायला पाणी नाही, अशा परिस्थितीत तुम्ही पक्ष फोडण्याचे काम करत आहात. हे लोक राजकीय दृष्ट्या ‘सिरीयल किलर’ आणि ‘रेपिस्ट’ आहेत. ते चोरी करणाऱ्यांच्या बाजूने संजय राऊत म्हणाले की, देशात सरकार त्यांचे असल्याने कोणत्याही प्रकरणाची चौकशी होत नाही. राम मंदिर प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचेच पदाधिकारी असून ते मोकळे फिरत आहेत. आम्ही आंदोलनासाठी देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांना बोलावले होते पण ते आले नाही म्हणजे ते चोरी करणाऱ्यांच्या बाजूने आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. देशात हुकुमशाही सुरू झाली संजय राऊत म्हणाले की, महात्मा गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण करत इंग्रजांना चर्चेसाठी समोर आणले होते. पण आता देशात सोनम वांगचुक यांच्यासारखा माणूस विद्यार्थ्यांसाठी उपोषण करत असताना तेव्हा सरकार चर्चा करायला तयार नाही. काळोखात त्यांच्यावर चादर टाकून फरफटत घेऊन गेले. त्यांच्यावर जबरदस्तीने उपोषण सोडण्यासाठी जो दबाव आणला त्यांचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे. ते देशासाठी प्राणत्याग करण्यासाठी तयार असल्याने सरकार त्यांना घाबरले आहे. सरकारने त्यांच्या मागण्यावर चर्चा करायला हवी, धर्मेद्र प्रधान हे काही फार महान नेते नाहीत. त्यांच्याकडून झालेल्या चुकांमुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. सरकार पोलिस बळाचा वापर करत वांगचूक यांना अटक करते दीपके यांना जखमी करत आहे. या देशात हुकुमशाही सुरू झाली आहे. उद्या दिल्लीतील मोर्चात आम्ही सहभागी होणार संजय राऊत म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना राजकीय दृष्टीने भीती वाटली म्हणून सोनम वांगचुक यांना उचलून नेले. सत्ताधारी लोकं डरपोक आहेत, त्यांना इंग्रजांची भीती कधी वाटली नाही कारण तुम्ही त्यांचे खबरी होतात, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. उद्या दिल्लीत होणाऱ्या मोर्चात आम्ही सर्व जण सहभागी होणार आहोत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *