Headlines

Bachchu Kadu Demands Finance Portfolio For NCP Amid Microfinance Controversy


सरकारने जी 5 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना जाहीर केली आहे त्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि 30 तारखेपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली तर बरे होईल, असे शिवसेना नेते बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिप संदर्भात को

.

बच्चू कडू म्हणाले की, महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेत काहीही तणाव नाही. मंत्रिमंडळ विस्तार दुष्काळामुळे होईल का नाही सांगता येत नाही. पण ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थखाते होते ते त्यांना दिले पाहिजे. खरगे यांच्यासारखा नेता जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पातळी सोडत असेल तर योग्य नाही.

..तर हंटर मारो आंदोलन

बच्चू कडू म्हणाले की, मायक्रो फायनान्स कंपनीने जर शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसुली केली तर त्यांच्याविरोधात आम्ही हंटर मारो आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांकडून कुठेही सक्तीची वसुली केली जात असेल तर हंटर मारा आणि त्या घटनेची आम्हालाही माहिती द्या. आम्ही त्याला रस्त्यावर चोपल्याशिवाय राहणार नाही.सरकारने पत्रिपत्रक काढून सुद्धा अवैध सावकार आणि छोट्या फायनान्स कंपन्या मानत नाही. या सर्वांनी वसुलीसाठी गुंड पोसले आहेत.

हे ही वृत्त वाचा

नांदेडमधील शेतकरी आत्महत्या चीड आणणारी:अवैध वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्सवर कठोर कारवाई करू- गृहराज्यमंत्री पंकज भोयर

नांदेडमधील शेतकऱ्यांची आत्महत्या ही चीड येणारी आहे, त्यामुळे निश्चितच दुषकाळ आणि अडचणीच्या काळात शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारत जर वसुली करण्यात येत असेल तर त्यांच्याचर कारवाई करण्यात येईल, असे पंकज भोयर यांनी म्हटले आहे. तर कायद्यामध्ये बदल करत अजून कडक कायद्या या बाबतीमध्ये केला जाईल.

पंकज भोयर म्हणाले की, राज्यात अर्थखाते कोणाला द्यायचे याचा निर्णय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आणि सुनेत्रा पवार हे एकत्र बसून योग्य तसे निर्णय घेतील. खरर्गे हे काँग्रेसचे वरीष्ठ नेते आहेत, त्यांनी केलेल्या वक्तव्यामधून त्यांच्या पक्षाचर संस्कृती काय हे समजू शकते. यातून काँग्रेसची संस्कृती दिसून येते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेच जर वरच्या पातळीची त्याचा निषेध करतो.

गृह राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, नांदेडमध्ये घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. मुदखेड तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे सारखा वसुलीचा तडाखा लावल्यामुळे त्या शेतकऱ्यांने कार्यालयात जात आत्महत्या केली. ही आत्महत्या आहे की हत्या याबद्दल तपास सुरू आहे. अवैध वसुली, अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी करत शेतकऱ्यांची जर लूट केली जात असेल तर मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांवर कठोर कारवाई केली जाईल. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.