Headlines

मतदार याद्यांमधील गोंधळाविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार:दोन महिने चालणार 'मत वाचवा, देश वाचवा' अभियान; पदयात्रा, चावडी सभा अन् दिल्ली मार्चचे नियोजन




काँग्रेसने ‘मत वाचवा, देश वाचवा’ हे दोन महिन्यांचे राष्ट्रव्यापी अभियान सुरू केले आहे. मतदार याद्यांमधील कथित गोंधळ, वगळलेली नावे आणि मतदानाच्या हक्काचे रक्षण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आमदार अमृत ठाकोर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे ही माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष डॉ. सय्यद आक्रम आणि जगन्नाथ काळे उपस्थित होते. संविधानाच्या कलम ३२६ नुसार मतदानाच्या हक्कावर गदा येत असल्याचे ठाकोर म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई होईपर्यंत लढा सुरू राहील, असा इशारा काँग्रेसने दिला. हे आंदोलन चार टप्प्यांत होणार आहे: गावोगावी चावडी सभा, ४ ते १० नोव्हेंबर दरम्यान बुथ लेव्हल तपासणी आणि १ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीची भव्य राष्ट्रीय रॅली. जिल्हाध्यक्ष डोणगावकर म्हणाले, “मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. हे आंदोलन जिल्हाभरात तीव्र केले जाईल.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *