Headlines

ॲपलच्या पहिल्या फोल्डेबल फोनची स्क्रीन क्रॅक होतेय:कंपनी म्हणाली- नवीन मोबाइल देऊ; गेल्याच महिन्यात लॉन्च झाला, किंमत ₹3 लाखांपासून सुरू




ॲपलच्या पहिल्या फोल्डेबल फोन आयफोन ड्युओच्या स्क्रीनमध्ये समस्या येत आहे. फोनची आतील स्क्रीन तुटणे आणि त्यावर क्रॅक येण्याच्या तक्रारी येत आहेत. ॲपलनेही ही बाब मान्य केली आहे. या फोनची किंमत ३ लाख ते ४.५ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. आयफोन ड्युओमध्ये हा डॅमेज बहुतेकदा त्याच ठिकाणी होत आहे, जिथून फोन मधोमध वाकतो (सेंट्रल हिंज). बहुतांश यूजर्सचे म्हणणे आहे की, फोन पहिल्यांदा उघडल्यानंतर आणि वापरल्यानंतर काही वेळातच स्क्रीन आपोआप खराब झाली. ॲपलने सोमवारी याबाबत सांगितले की, आयफोन ड्युओच्या काही युनिट्सच्या इनर डिस्प्लेमध्ये येत असलेल्या समस्येची आम्हाला माहिती आहे. ही खराबी काही मोजक्याच फोनमध्ये आढळली आहे. कंपनी हे फोन बदलून यूजरला नवीन फोन देईल. वापरकर्ते मोफत रिप्लेसमेंट कसे मिळवू शकतात? कंपनीने ग्राहकांना सल्ला दिला आहे की, त्यांच्या आयफोन डुओच्या स्क्रीनमध्ये काही समस्या आढळल्यास त्यांनी त्वरित रिप्लेसमेंटसाठी AppleCare शी संपर्क साधावा. ॲपलने 9 सप्टेंबर रोजी आपला पहिला फोल्डेबल फोन आयफोन डुओ लॉन्च केला होता. सर्वात मोठा डिस्प्ले, सर्वात महागडा आयफोन
आयफोन डुओमध्ये 5.4 इंचांचा कव्हर डिस्प्ले आणि आत 7.6 इंचांची मुख्य स्क्रीन आहे, जी आतापर्यंतच्या कोणत्याही आयफोनमधील सर्वात मोठी डिस्प्ले आहे. डुओ हा ॲपलचा आतापर्यंतचा सर्वात महागडा आयफोन आहे. त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 3 लाख रुपये आहे, तर टॉप मॉडेलची किंमत 4.50 लाख रुपयांपर्यंत जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *