Headlines

5.96 कोटी हडपले; ‘लोक आदर्श’च्याअध्यक्षाला चार महिन्यांनंतर पकडले:उपाध्यक्ष, सचिवालाही अटक; आरोपींची 7 दिवस पोलिस कोठडीत रवानगी




शहागंज येथील लोक आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत बोगस व्हाउचर आणि बनावट खात्यांद्वारे 5 कोटी 96 लाख रुपयांचा घोटाळा करणाऱ्या अध्यक्षासह उपाध्यक्ष, सचिवाला आर्थिक गुन्हे शाखेने पकडले. गुन्हा दाखल झाल्यावर गेल्या 4 महिन्यांपासून ते पसार होते. या तिघांनाही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अध्यक्ष अनिस समद पठाण ( 35 रा. चितेगाव, ता. पैठण. ) उपाध्यक्ष सय्यद एजाज अब्दुल गफ्फार (50, रा. टाइम्स कॉलनी), सचिव शेख विखार अहेमद शफिक अहमद (36 रा. नागसेन कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. अध्यक्ष अनिस पठाण व अन्य आरोपी मुकुंदवाडीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक प्रताप साळवे, इल्तेजा शेख यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. राहण्याचे ठिकाण आरोपी सतत बदलत होते गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच अध्यक्ष अनिस पठाण याच्यासह सर्व आरोपी पसार झाले. अटकेची कारवाई टाळण्यासाठी ते सतत आपली राहण्याची ठिकाणे बदलत होते. आरोपी अध्यक्ष पठाण याने पतसंस्थेतील गैरव्यवहारातून मिळ‌लेला पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याची पोलिसांनी शंका आहे. त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. पतसंस्थेतील पैसे बोगस व्हाउचरद्वारे उचलले लोक आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 2022 ते 2025 दरम्यान संगणकीय प्रणालीचा गैरवापर व बोगस व्हाउचरद्वारे तब्बल 5 कोटी 96 लाखांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आले होते. शासकीय लेखापरीक्षक द्वारकादास इधाटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *