Headlines

8 कुत्र्यांनी 3वर्षांच्या बालकाला शिर,पाय धडापासून वेगळे करून ठार मारले:संभाजीनगरच्या खुलताबादेतील शेतवस्तीवरील हृदयद्रावक घटना




खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथे माटेगाव चौफुली ते देवपुढी रस्त्यावरील शेतवस्तीवर 8 हिंस्र कुत्र्यांच्या टोळक्याने अवघ्या तीन वर्षांच्या एका चिमुकल्याचे लचके तोडून ठार केले. कुत्र्यांनी बालकाचे मुंडके आणि डावा पाय धडापासून वेगळा केला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाची परिसीमा म्हणजे, या चिमुकल्याची आई जन्मजात मूकबधिर असल्याने मृत्यूशी झुंजताना त्याने मारलेली शेवटची आर्त हाकही तिच्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील मूळ रहिवासी असलेले गजानन पाटील हे रोजगाराच्या शोधात खुलताबाद तालुक्यात आले आहेत. ते आपल्या कुटुंबासह एका पोल्ट्री फार्मवर मजुरी करतात. बुधवारी भरदुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांचा तीन वर्षांचा मुलगा सार्थक खेळता खेळता घराबाहेर आला. याच वेळी मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने या कोवळ्या जीवावर अचानक हल्ला चढवला. कुत्र्यांनी त्याचे डोके आणि डावा पाय शरीरापासून वेगळा केल्याने त्याचा जागीच अंत झाला. घटनेवेळी वडील गजानन पाटील हे कामात व्यस्त होते. काही वेळाने त्यांनी त्याचा शोध घेतला असता मुलाची भयंकर अवस्था पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक मनोहर पुंगळे आणि राकेश आव्हाड यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मसिउद्दीन शेख यांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून मृतदेह वेरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश केरे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह या शोकाकुल कुटुंबाच्या स्वाधीन केला. सार्थक जेव्हा मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडला, तेव्हा त्याने जीवाच्या आकांताने आईला नक्कीच हाका मारल्या असणार. मात्र, त्याची आई जन्मजात मूकबधिर असल्याने तिला आपल्या बाळाचा आक्रोशच ऐकूच आला नाही. कुत्रे पॅक मेंटालिटीत असल्यावर हल्ला करतात तज्ज्ञांच्या मते, मोकाट कुत्र्यांचा कळप जेव्हा एकत्र असतो, तेव्हा ते ‘पॅक मेंटालिटी’त (शिकारीच्या मानसिकतेत) येतात. अशा वेळी ते सहसा आकाराने लहान व एकट्या व्यक्तीला वा लहान मुलांना सहज लक्ष्य करतात. मोकाट कुत्र्यांच्या कळपाशी गाठ पडल्यास न पळता, त्यांच्या डोळ्यात न बघता शांत उभे राहणे हाच बचाव ठरू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *