Headlines

राज्यातील 25 जिल्ह्यांतून जाणार राज्यमाता गोमाता संवाद यात्रा:पुणे येथून 31 मे रोजी सुरुवात, 6 हजार किलोमिटरचा प्रवास




राज्यात देशी गोवंश पालन पोषण संदर्भात जनजागृतीसह संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा प्रचार व प्रसाराच्या उद्देशाने पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने ता. ३१ मे पासून राज्यमाता गोमाता संवाद यात्रा काढली जाणार आहे. राज्यातील २५ जिल्हयातून हि यात्रा ६ हजार किलो मिटरचा प्रवास करणार आहे. यावेळी ठिकठिकाणी सभा घेतल्या जाणार आहेत. राज्यात पशुसंवर्धन विभाग व गोसेवा आयोगाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या संवाद यात्रेचे उदघाटन ता. ३१ मे रोजी दुपारी साडेचार वाजता पुणे येथे पशुसंवर्धन आयुक्तालय येथे होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री पंकजाताई मुंडे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर हि संवाद ता. १ जून रोजी सकाळी अहिल्यानगर व सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचणार आहे. यावेळी सभा देखील घेतली जाणार आहे. त्यानंतर सदर यात्रा ता. २ जून रोजी सकाळी जळगाव, सायंकाळी धुळे, ता. ३ जून सकाळी नाशीक, सायंकाळी ठाणे, ता. ४ जून सकाळी रायगड सायंकाळी सिंधुदुर्ग, ता. ५ जून सकाळी कोल्हापूर सायंकाळी सोलापूर, ता. ६ जून सकाळी लातुर, सायंकाळी नांदेड, ता. ७ जून सकाळी परभणी, सायंकाळी बीड, ता. ८ जून सकाळी जालना, सायंकाळी बुलढाणा, ता. ९ जून सकाळी अकोला, सायंकाळी वाशीम, ता. १० जून सकाळी अमरावती सायंकाळी यवतमाळ, ता. ११ जून सकाळी वर्धा सायंकाळी चंद्रपूर, ता. १२ जून सकाळी गोंदिया सायंकाळी भंडारा तर ता. १३ जून रोजी नागपूर येथे पोहोचणार आहे. ता. १४ जून रोजी नागपूर येथे यात्रेचा समारोप होणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. १ हजार गोशाळांचा असणार सहभाग सदर गो संवाद यात्रा १५ दिवस चालणार आहे. यात्रा सहा हजार किलोमिटरचा प्रवास करणार असून राज्यातील २५ जिल्ह्यांत संचालन होणार आहे. तसेच यावेळी १ हजार गोशाळांचा सहभाग असणार आहे तसेच १५ हजार गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक व शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. काय आहे या यात्रेचा उद्देश या संवाद यात्रेमध्ये गोधारित शेतीचा प्रचार व प्रसार करणे, गोशाळा आत्मनिर्भर करणे, गोबर, गोमुत्र यापासन तयार होणाऱ्या गोमय मुल्यवर्धन उत्पादनांचा प्रसार, गोशाळा संचालकांची आढावा बैठक, पशुसंवर्धन विभाग व गोशाळा यांच्यात समन्वय राखणे, पोलिस व गो रक्षक यांच्यात समन्वय राखणे, संपूर्ण गोवंध हत्याबंदी कायदा प्रचार व प्रसार तसेच देशी गोवंश पालन पोषण संदर्भात जनजागृतीच्या उद्देशाने हि यात्रा काढली जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *