![]()
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना अहिल्यानगर शहराच्यावतीने व एकता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, परिसरातील नागरिकांनी लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारत हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता न ठेवता वृक्षसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले. शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना समाजकारण, पर्यावरण संवर्धन आणि जनसेवेचे संस्कार दिले. धर्मवीर आनंद दिघे यांनी हे विचार कृतीतून जपले. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत शिवसेना समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत आहे. झाडे लावणे ही केवळ सुरुवात आहे; ती जगविणे ही खरी जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा.” माजी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वृक्षारोपणासोबत वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांनी स्वतःहून वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली ही अत्यंत समाधानाची बाब असून अशा उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाची जनचळवळ अधिक बळकट होईल. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, दत्तात्रय कावरे, बाळासाहेब बोराटे, मंगल लोखंडे, पवन गांधी, आदेश जाधव, शिवाजी कदम, घनश्याम घोलप आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून “झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Source link
वाढत्या प्रदूषणाला वृक्षसंवर्धनानेच नगरकर देणार उत्तर:वाडिया पार्क परिसरात वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली वृक्षसंवर्धनाची जबाबदारी