Headlines

कर्जमाफीसाठी आज संभाजीनगरातील केंब्रिज चौकात रोहित पवारांचे आंदोलन:सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ असणार उपस्थिती




शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने सोमवारी (२९ जून) सकाळी ११ वाजता केंब्रिज चौकात भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या महाआंदोलनात संपूर्ण मराठवाड्यातून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, तब्बल एक हजारांहून अधिक बैलगाड्या रस्त्यावर उतरण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ हे करणार आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला तातडीने दिलासा देण्यासाठी सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी आक्रमक भूमिका या नेत्यांनी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत होणारे हे भव्य बैलगाडा आंदोलन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. या आंदोलनाचे संभाव्य पडसाद लक्षात घेता, प्रशासनाने केंब्रिज चौक परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *