Headlines

शिक्षकांपूर्वीच शिक्षणाधिकारी शेख शाळेत दाखल:शैक्षणिक, प्रशासकीय कामकाजाचा घेतला आढावा, शैक्षणिक सीमावर्ती शाळांची अचानक पाहणी




विद्यार्थी-केंद्रित शिक्षण व्यवस्थेला प्राधान्य देत शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शनिवारी पहाटेच अक्कलकोट तालुक्यात सीमावर्ती भागातील जिल्हा परिषद शाळांची अचानक पाहणी केली. विशेष म्हणजे शिक्षकांच्या उपस्थितीपूर्वीच शाळेत दाखल होत त्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यांच्या या कार्यतत्परतेचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. पाहणीची सुरुवात संगोगी (ब) येथील जिल्हा परिषद शाळेपासून करण्यात आली. येथे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधत शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापनाची पद्धत, विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा आणि शाळेच्या एकूण कार्यप्रणालीची माहिती घेतली. सकाळीच शिक्षणाधिकारी शाळेत पोहोचल्याने ग्रामस्थांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. यानंतर त्यांनी सीमावर्ती सिन्नूर येथील मराठी, उर्दू आणि कन्नड माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळांना भेट देत परिसरातील स्वच्छता, शिस्त, मूलभूत सुविधा आणि शालेय वातावरणाची पाहणी केली. शालेय परिपाठात सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचीही माहिती घेतली. या पाहणी दौऱ्यात अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *