![]()
पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वी (विज्ञान शाखा) या वर्गांमधील लॅटरल एंट्री प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2026 होती, ती आता 22 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतवाढीचा जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. ओ. देशमुख यांनी केले आहे. अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी (Correction Window) वेळ: ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अर्जात काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 23 ऑक्टोबर 2026 ते 25 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘ऑनलाइन करेक्शन विंडो’ उपलब्ध राहील. नोंदणी केलेले उमेदवार या कालावधीत केवळ प्रवर्ग (Category), लिंग (Gender), क्षेत्र (Area) आणि दिव्यांगत्व (Disability) या तपशीलांमध्ये आवश्यक दुरुस्त्या करू शकतील. अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ (Websites): ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचूनच अचूक माहिती भरावी, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.
Source link
मिशन ॲडमिशन:नवोदय विद्यालयातील 9 वी व 11 वी प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जास 22 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ