![]()
नागपूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उत्तर नागपूरमधील एका शाळेत एकत्र शिकणाऱ्या 18 वर्षीय तरुणाने त्याच्याच शाळेतील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केले. यातून ती अल्पवयीन तरुणी गर्भवती राहिली. या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपी तरुणाने गर्भपात करण्यासाठी एक भयंकर मार्ग निवडला. त्याने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून काही औषधी वनस्पतींचे एक मिश्रण तयार केले आणि ते या अल्पवयीन तरुणीला पिण्यासाठी दिले. यूट्यूबच्या आधारे घरगुती प्रयोग करून गर्भपात करण्याचा त्याचा हा बेकायदेशीर आणि जीवघेणा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला. या प्रकारामुळे अल्पवयीन तरुणीची प्रकृती अचानक बिघडली आणि तिने घरीच एका बाळाला जन्म दिला. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पाचपावली पोलिसांनी तातडीने कारवाई करत 18 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. पाच वर्षांपूर्वीही घडली होती अशीच घटना पाच वर्षांपूर्वी सोहेल खान (वय 24, रा. गरीब नवाजनगर) याने एका 24 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. यातून ती तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिने पती म्हणून सोहेलच्या नावाची डागा रुग्णालयात नोंदणी केली व ती नियमित तपासणीला जाऊ लागली. मात्र, एके दिवशी तरुणीचे नातेवाईक बाहेरगावी गेले असताना ती चुकून खाली पडली आणि त्यात तिच्या गर्भातील अर्भकाचा मृत्यू झाला. यू-ट्यूब पाहून गर्भपात अर्भकाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तरुणीने आपला प्रियकर सोहेल याला माहिती दिली. त्यावेळी त्याने तिला रुग्णालयात नेण्याऐवजी यू-ट्यूबवरील व्हिडिओ बघून स्वतःच गर्भपात करण्याचा धक्कादायक सल्ला दिला. त्याच्या सल्ल्यानुसार तरुणीने व्हिडिओ पाहून अर्भक बाहेर काढले आणि कात्रीने नाळ कापली. त्यानंतर सोहेलने तिच्या घरी येऊन त्या मृत अर्भकाला थेट स्मशानभूमीत नेऊन पुरले. पोलिसांत तक्रार आणि अटक या भयंकर प्रकारानंतर सोहेलने तरुणीसोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. काही दिवसांनी तरुणीचे नातेवाईक घरी परतल्यानंतर त्यांना रुग्णालयाची कागदपत्रे सापडली. त्यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता या सर्व धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला. त्यानंतर तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अत्याचारासह बळजबरीने गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून सोहेलला अटक केली. तपासात सोहेलने आधीच्या पत्नीला घटस्फोट देऊन आणखी एका तरुणीसोबत दुसरे लग्न केल्याचीही माहिती समोर आली आहे.
Source link
नागपुरात धक्कादायक प्रकार!:यू-ट्यूब पाहून अल्पवयीन तरुणीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न, शाळेतील मित्राला अटक; काय आहे प्रकरण?