![]()
बेकायदा प्रवासी वाहतूक प्रकरणी रोपेन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. (रॅपिडो) कंपनीविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक प्रसाद सुरवसे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ‘रॅपिडो’ कंपनीविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३१८ (३), मोटार वाहन कायदा, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) ‘बाईक टॅक्सी’ला (पेट्रोल इंजिन असलेली दुचाकी) प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली नाही. ‘रॅपिडो’ कंपनीकडून प्रवासी वाहतुकीबाबतचे ॲप तयार करण्यात आले. या ॲपद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करुन प्रवासी वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पोलिसांकडे तक्रार दिली. बेकायदा प्रवासी वाहतूक करुन शासनाची फसवणूक केल्याचे मोटार वाहन निरीक्षक सुरवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस राऊत तपास करत आहेत. गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली. भवानी पेठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. मोईन आसिफ घोडके (वय २५, रा. भवानी पेठ मटण मार्केटजवळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी समर्थ पोलीस ठाण्यात घोडके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. गेले सहा महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. घोडके हा भवानी पेठ परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस हवालदार प्रमोद जगताप, उमेश शेलार यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक दीपक लगड, सहायक निरीक्षक धीरज राऊत, किरण मोरे, सचिन कोळी, अविनाश दळवी यांनी ही कारवाई केली. —————- हेही वाचा.. सायबर चोरट्यांचा ज्येष्ठ नागरिकांना लाखोंचा गंडा:शेअर बाजाराच्या आमिषाने 39 लाख, सिनिअर सिटीजन कार्डच्या नावाखाली 14 लाख लुटले
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची चोरट्यांनी ३९ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सविस्तर वाचा
Source link