![]()
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची चोरट्यांनी ३९ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील काळेबोराटेनगर परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. चोरट्यांनी त्यांना एक ॲप मोबाइलमध्ये घेण्यास सांगितले. या ॲपच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी गुंतवणूक योजनांबाबतची माहिती त्यांना दिली. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्यात आले. चोरट्यांंच्या खात्यात त्यांनी तीन महिन्यांत वेळोवेळी ३९ लाख ७४ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर तपास करत आहेत. सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची १४ लाखांची आर्थिक फसवणूक सिनिअर सिटीजन कार्ड देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी १४ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७२ वर्षीय ज्येष्ठ महिला कोंढव्यातील फकरी हिल्स भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर १३ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला. एका राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. बँकेकडून सिनिअर सिटीजन कार्ड देण्यात येणार आहे, अशी बतावणी चोरट्यांनी केली. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एपीके फाईल पाठविली. एपीके फाईल उघडल्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. मोबाइल क्रमांकाची जोडणी बँक खात्याशी करण्यात आली आहे. चोरट्याने बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून १४ लाख २७ हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. ही रक्कम दुसऱ्या खात्यात वळविण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक तांबोळी तपास करत आहेत. ————– हेही वाचा.. ऊस दराचा भडका!: दर जाहीर न करताच कारखाने सुरू केल्याने स्वाभिमानी आक्रमक; शिरूरमध्ये उसाचा ट्रॅक्टर पेटवला यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाचा दर अद्याप जाहीर न करताच साखर कारखान्यांनी गाळप सुरू केल्याने शेतकरी संघटनांचा संताप आता उफाळून आला आहे. शिरूर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखाना परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत उसाची वाहतूक करणारी वाहने रोखली. इतकेच नाही, तर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. सविस्तर वाचा
Source link
सायबर चोरट्यांचा ज्येष्ठ नागरिकांना लाखोंचा गंडा:शेअर बाजाराच्या आमिषाने 39 लाख, सिनिअर सिटीजन कार्डच्या नावाखाली 14 लाख लुटले