Headlines

शहीद जवानांचे बलिदान राष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक:शहीद जवान अप्पासाहेब काटे यांच्या स्मृतिस्थळाचे लोकार्पण




कुंभेज देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतीस्थळाचे लोकार्पण व पुण्यस्मरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतीय सेनेचे कर्नल सुनील राजदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, आजी-माजी सैनिक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात मेजर सुभाष मुटके यांच्या नेतृत्वाखाली एनसीसी कॅडेट्सनी राष्ट्रध्वज आणून ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मारकाचे लोकार्पण करून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. कर्नल सुनील राजदेव म्हणाले, शहीद जवानांचे बलिदान हे राष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहे. कुंभेज येथील हे स्मृतिस्थळ भावी पिढीला राष्ट्रसेवा, शिस्त आणि समर्पणाची प्रेरणा देणारे पवित्र स्थान ठरेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष मेजर अक्रूर शिंदे यांनी केले. त्यांनी शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. यावेळी शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अनिल कादगे यांनी दिगंबरराव बागल विद्यालयासाठी सुमारे ६५ हजार रुपयांचा आर.ओ. वॉटर फिल्टर भेट दिला. तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे यांच्या वतीने त्यांना ‘समाजरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे व कल्याणराव साळंके यांनी केले. सुभेदार मेजर बिभीषण कन्हेरे यांनी आभार मानले. युवकांमध्ये देशभक्ती भावना अधिक दृढ त्यागाची ^कुंभेजमध्ये उभारलेले हे स्मृतिस्थळ म्हणजे शहीद जवानाप्रती ग्रामस्थांनी व्यक्त केलेली सामूहिक कृतज्ञता आहे. अशा उपक्रमामुळे युवकांमध्ये देशभक्ती, त्याग आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होते. ॲड. बाबूराव हिरडे, ग्रामस्थ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *