नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

भारतीय निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर) मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. जो सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय जनगणनेसोबतच पार पाडला जाईल. या टप्प्यात देशभरात ३.९४ लाखांहून अधिक बीएलओ ३६.७३ कोटी मतदारांची, तर महाराष्ट्रात ९ कोटी ८६ लाख ४४ हजार ४१३ मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी करतील.
महाराष्ट्रात ३० जून २०२६ पासून सुरू होणारी ही ‘डेटा-ड्रिल’ २९ जुलै २०२६ पर्यंत चालेल. येथे ९७,९२४ बीएलओ, ९६,९४९ बीएलए (राजकीय पक्षांचे प्रतिनिधी) काम पाहतील. पडताळणीनंतर ५ ऑगस्ट रोजी प्रारुप यादी प्रसिद्ध होईल. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.
मतदार यादीत तुमचे नाव असे सुरक्षित ठेवा
बीएलओ घरी आल्यावर आधार कार्ड, मतदान कार्ड दाखवून नाव ‘व्हेरिफाय’ करा. सोसायटी, वसाहतींमध्ये बीएलओंना प्रवेश राहील, याची खातरजमा करा. ५ ऑगस्टला प्रारूप यादी आल्यावर ‘ECINET’ ॲपवर, voters.eci.gov.in वर नाव तपासा.
‘लाडकी बहीण’चा इम्पॅक्ट, नवमतदारांना संधी
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांनी कागदपत्रे आणि पत्ते अपडेट केले आहेत. याचा थेट फायदा या मोहिमेत होऊन महिला मतदारांचा टक्का वाढेल. १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या हजारो ‘जेन झी’ तरुणांना यादीत स्थान मिळेल. महिला व नवमतदार पुढील निवडणुकीत निर्णायक भुमिका बजावतील.
ते सर्वकाही जे तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे
एसआयआर म्हणजे काय? एसआयआर म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. निवडणूक आयोगाद्वारे मतदार यादी अचूक बनवण्यासाठी ही देशव्यापी मोहीम. याचा काय फायदा? २०२९ पर्यंत लोकसभा व २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा निवडणुका होतील. तिसऱ्या टप्प्यानंतर आयोगाकडे ९५% मतदारांची शुद्ध यादी असेल. पहिला-दुसरा टप्पा कधी झाला? पहिला जून-सप्टेंबर २०२५. दुसरा २७ ऑक्टोबर ते फेब्रुवारी २०२६. एकूण ४.९२ कोटी नावे वगळली. या राज्यांमध्ये झाले आहे? बिहार, बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, यूपी, राजस्थान, एमपी, गुजरात, छत्तीसगड, गोवा, तिसरा टप्पा कुठे होईल? दिल्ली, ओडिशा, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर, उत्तराखंड, आंध्र, अरुणाचल, हरियाणा, चंदीगड, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, मेघालय, महाराष्ट्र, झारखंड, नागालँड, त्रिपुरा, दादरा आणि नगर हवेली, दमण-दीव.
दोन वर्षांत कुठे निवडणुका?
२०२७ मध्ये गोवा, पंजाब, मणिपूर, यूपी, गुजरात, हिमाचल, उत्तराखंड तर २०२८ मध्ये छग, मप्र, राजस्थान सह ९ राज्ये. महाराष्ट्रात २०२९ मध्ये. महाराष्ट्रात ९.७० कोटींहून अधिक मतदार असून त्यात ५ कोटी पुरुष व ४.७० कोटी महिलांचा समावेश आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण मतदार संख्या सुमारे ३२ लाख ६६ हजार असून यात अंदाजे १६.३० लाख पुरुष आणि १५.१८ लाख महिला मतदारांचा समावेश आहे. तर शहरात ११,१८,२८४ मतदार आहेत.