![]()
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. शेतकरी प्रश्न, कर्जमाफी, पेपरफुटी, कायदा-सुव्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. . दरम्यान, अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांना कथित धमकी आणि शिवीगाळ केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले होते, तोच मुद्दा आज पाचव्या दिवशीही विरोधक लावून धरण्याची चिन्हे आहेत. हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये तीव्र खडाजंगी पाहायला मिळत आहे. पत्रकारांच्या सुरक्षेवरून विरोधक आक्रमक अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांना झालेल्या कथित धमकी आणि अपशब्दांच्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना अशा प्रकारे धमकावले जात असेल, तर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे काय? असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे. आज पाचव्या दिवशीही या प्रकरणावरून सभागृहात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी, कर्जमाफी आणि राजकीय मुद्द्यांवरून रणकंदन तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात केवळ पत्रकारांचाच मुद्दा नाही, तर राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, पेपरफुटी आणि विविध राजकीय घडामोडींवरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याची पूर्ण तयारी केली आहे. निवडणूक तोंडावर असल्याने सरकारला बॅकफूटवर आणण्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून, आजचा पाचवा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. नसरापूरप्रकरणी नराधमाच्या शिक्षेवर आज अंतिम निर्णय शक्य:फाशी की जन्मठेप यावर निर्णय, सरकारी वकिलांची मृत्युदंडाची मागणी नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला सोमवारी विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप, याबाबतचा अंतिम निर्णय होणार असून या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह नागरिक आणि विविध सामाजिक संघटनाही न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयाने गुरुवारी कांबळेला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवले. त्यानंतर शिक्षेच्या मुद्द्या वर सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि मूळ फिर्यादी यांच्या वतीने स्वतंत्रपणे युक्तिवाद करण्यात आला. बातमीचे अपडेट्स वाचा
Source link
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस:शेतकरी कर्जमाफी, पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी