Headlines

जलसंकटावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक स्वच्छतेवर भर:सिंबायोसिसच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांचे मत, ‘इकोसॅन इन प्रॅक्टिस’ पुस्तकाचे प्रकाशन




वाढते जलसंकट, जलप्रदूषण आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक स्वच्छता, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि संसाधनांचे पुनर्प्राप्तीकरण यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असा सूर सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत उमटला. शहरी जलव्यवस्थापनात निसर्गकेंद्री दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहनही तज्ज्ञांनी केले. ‘चक्रीय अर्थव्यवस्थेपासून पर्यावरणपूरक स्वच्छतेकडे : शहरी जलव्यवस्थेत निसर्गाला केंद्रस्थानी आणणे’ या विषयावर लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात दोन दिवसीय परिषद झाली. देश-विदेशातील जलव्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी यात सहभाग घेतला. उद्घाटन सत्रात स्वित्झर्लंडच्या सीकॉन संस्थेचे वरिष्ठ भागीदार डॉ. योहान्स हीब यांनी कचऱ्याचे उपयुक्त संसाधनांमध्ये रूपांतर करण्यासाठी चक्रीय अर्थव्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट केले. तमिळनाडू राज्य नियोजन आयोगाच्या माजी अध्यक्षा संथा शीला नायर यांनी पर्यावरणपूरक स्वच्छतेचा शहरी नियोजनात समावेश करण्याची गरज मांडली. डॉ. संजय दहासहस्र आणि डॉ. अर्ने राज पनेसर यांनी शाश्वत जलव्यवस्थापन, जलसंवर्धन आणि संसाधनांच्या पुनर्वापरावर भर दिला. परिषदेचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या ‘इकोसॅन इन प्रॅक्टिस’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पर्यावरणपूरक स्वच्छता क्षेत्रातील दोन दशकांतील अनुभव, संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. ‘सेन्सेई’ उपक्रमांतर्गत शैक्षणिक संस्था आणि उद्योगांमध्ये सामंजस्य करारही करण्यात आले. विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया, पोषक घटकांचे पुनर्प्राप्तीकरण आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या उपाययोजनांवर तांत्रिक चर्चासत्रे झाली. ‘वन हेल्थ’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाश्वत सांडपाणी व्यवस्थापनाच्या संकल्पना मांडल्या. परिषदेतील शिफारशींच्या आधारे हवामान बदलाच्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी शहरी जलव्यवस्थापनाचा कृती आराखडा आणि धोरणात्मक शिफारशी तयार करण्यात येणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *