Headlines

लातुरात नीटचे पेपर सेटर निवृत्त प्राध्यापक सीबीआयच्या ताब्यात:शुभमसह इतर आरोपींची दिल्लीत चौकशी, मनीषा ‌‌वाघमारेही अटकेत




नीटची परीक्षा ३ मे रोजी झाली. पण १ मे रोजी प्रश्नपत्रिका लातुरातील विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर हस्तलिखीत स्वरुपात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. परंतु या प्रश्नपत्रिकेचा स्त्रोत अद्याप पोलिसांना सापडला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांकडे ज्या पालकाने (या पालकाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे) तक्रार केली त्यांच्याकडे एका विद्यार्थ्याकडून परीक्षेच्या दोन दिवस आधी एक प्रश्नपत्रिका आली होती. ३ मे रोजी नीटची परीक्षा पार पडली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, दोन दिवसापूर्वी आपल्याला मिळालेली प्रश्नपत्रिका आणि नीटच्या परिक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न यात कमालीचे साधर्म्य आहे. लातूर पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीतही ही बाब स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. १२ तास चौकशीनंतर दिल्लीला नेले मुंबईतून आलेले सीबीआयचे दोन अधिकारी हैद्राबादमार्गे लातुरात दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने उषा किरण पेट्रोल पंपामागील प्रा. कुलकर्णी यांच्या घरी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हे पथक धडकले. १२ तास त्यांच्या संपूर्ण घराची झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या घरातून कागदपत्रे, लॅपटॉप आणि अन्य साहित्य या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुलकर्णी केमिस्ट्रीचे, फुटलेले बहुतांश प्रश्नही केमिस्ट्रीचेच नामांकित महाविद्यालयातून ४ वर्षांपूर्वी निवृत्त, केमिस्ट्रीचे प्राध्यापक कुलकर्णी मागील चार वर्षांपासून वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे (नीट) पेपर सेट करणाऱ्या कमिटीवर आहेत. या वर्षी फुटलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या पेपरमधील बहुतांश प्रश्न हे केमिस्ट्री विषयाचे आहेत. सेवानिवृत्त प्राध्यापक, नीट परीक्षेचे पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांना सीबीआयच्या पथकाने ताब्यात घेतले. १२ तासांच्या चौकशीनंतर त्यांना दिल्लीला नेले. दरम्यान, मनीषा ‌वाघमारेलाही गुरुवारी अटक करण्यात आली. या आधी नाशिक येथून शुभम खैरनार, पुण्यातून धनंजय लोखंडे (मू. रा. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांना अटक झाली आहे. मुंबईतून लातुरात आलेले सीबीआयचे पथक गुरुवारी (१४ मे) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास या प्राध्यापकांच्या बार्शी रोडवरील घरी धडकले. हे पथक प्रा. कुलकर्णींना सोबत घेऊन मुंबईला आणि तेथून दिल्लीला रवाना झाले. ‘डिपर’ संस्थेसोबत ११ वर्षांपासून काम पुण्याची DEEPER (District Entrance Exam Performance Enhancement Research) संस्था नीट, जेईई मेन आणि एमएचटी-सीईटी सारख्या प्रवेश परीक्षांच्या सराव परीक्षा आयोजित करते. मॉक टेस्ट, प्रश्नसंच व शैक्षणिक मार्गदर्शन करते. राज्यभरातील प्राध्यापक व विषय तज्ज्ञांच्या सहभागातून प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी ‘पेपर सेटिंग कॅम्प’ आयोजित केले जातात. या संस्थेसोबत लातूरचे प्रा. पी. व्ही. कुलकर्णी हे ११ वर्षांपासून जोडले गेलेले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *