Headlines

व्याख्याते प्रदीप सोळुंके यांनी मुलींच्या वसतिगृहाला दिली ५,७४८ पुस्तके भेट:छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राबवला उपक्रम‎




प्रतिनिधी | खंडाळा मराठा सेवा संघाच्या वतीने आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित संत तुकोबाराय व्याख्यानमालेत एका स्तुत्य उपक्रमाची नोंद झाली आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या अंतर्गत, १६ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिजाऊ मंदिर येथे वक्ते प्रदीप सोळुंके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वक्ते प्रदीप सोळुंके यांनी आपल्या वैयक्तिक ग्रंथालयातील ५ हजार ७४८ पुस्तके मुलींच्या वसतिगृहाला दान केले. प्रदीप सोळुंके यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती संभाजी महाराज यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वावर प्रकाश टाकला. विद्यार्थींनी या पुस्तकांचा लाभ घेऊन आपले मस्तक सशक्त करावे, असे प्रदीप सोळुंके यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टी. आर. जाधव, प्रा. चंद्रकांत भराट संस्थापक प्रदेशाध्यक्ष, छावा, डी. एम. पाटील जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ, धनंजय पाटील विभागीय अध्यक्ष, प्रा. विजया मुसंडे आणि देवरावजी पतंगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव साठे यांनी केले, तर आभार वैभव बोडखे यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *